27752024_10156039602790295_4782661293046751421_n

नवरा-बायको : चावटपणा महत्वाचाच.

One Kiss Can Change Your Life …..

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

( सूचना : पोस्ट पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया नोंदवा ☺️)

एखाद्या गोष्टीचा पाया मजबूत नसेल किंवा तो ठिसूळ असेल तर त्या गोष्टीचा अंत निश्चितपणे लवकर होतो. नातेसंबंधांमध्ये सुद्धा असेच आहे. नाते कोणतेही असो त्याचा पाया हा नक्कीच मजबूत असायला हवा. मैत्रीमध्ये सुद्धा जर विश्वास आणि प्रेम नसेल आणि आवश्यक तेवढा वेळ एकमेकांना नाही दिला तरी गैरसमज होऊन नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. अशी अनेक नाती आहेत ज्याबद्दल हे लागू होते. परंतु या सर्वांमध्ये ‘नवरा-बायको’ एक असे नाते आहे जे खूप वेगळे आहे. या नात्यामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष संपूर्ण आयुष्यातील जास्तीतजास्त वेळ एकमेकांसोबत असतात. संसाराच्या सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत ते अनेक सुख-दुःखाचे साथीदार असतात. अनेक बरे-वाईट अनुभव त्यांनी पाहिलेले असतात. अगदी मुलांच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत अनेक आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अडचणींना तोंड दिलेले असते. भारतीय समाजव्यस्थेमध्ये एवढ्या भीतीदायक पद्धतीने सांगितली जाते की विचारू नका. लग्न आणि संसार म्हणजे डोकेदुखी असते. नात्यांमध्ये फ्रिडम नसतो. कॉम्प्रमाईस करावे लागते. अशा प्रकारचे अनेक शोध काही बुद्धीवंतांनी लावले आहेत. आणि अशाच मानसिकतेमुळे ‘नवरा-बायको’ हे नाते म्हणजे एक समाजाने जबरदस्तीने जोडून दिलेले नाते असे मानले जात आहे.

काही लोकांनी याला उपाय म्हणून प्रेम-विवाहाला प्राधान्य दिले. परंतु ज्यावेळी अपेक्षांचा डोंगर हा नात्यांपेक्षा मोठा होतो त्यावेळी प्रेम-विवाह काय किंवा घरच्यांनी जुळविलेला विवाह काय, तो लवकर तुटणार हे नक्की आणि जर सामाजिक दबावाखाली येऊन वेगळे नाही होता येत तर मग नावापुरते नाते ठेवून जीवन जगणे भाग पडते. जो मनुष्य खरच शहाणा आहे तो लग्नानंतर यशस्वी बनतो आणि जो अतिशहाणा आहे तो लग्नानंतर तत्वज्ञानी होतो आणि लग्न-बिग्न म्हणजे डोकेदुखी आहे असे सांगत फिरतो.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्री शक्यतो सोशिक असते. बऱ्याच गोष्टी तिच्या मनामध्ये असतात पण ती बोलून दाखवत नाही. पुरुष मात्र जे पाहिजे ते नक्कीच मागत असतो. नवऱ्याला शक्यतो वाटत असते की बायकोला साडी घेऊन देणे, कुठेतरी चार दिवस फिरायला घेऊन जाणे, बाहेर हॉटेल्समध्ये जेवायला घेऊन जाणे म्हणजे बायकोला वेळ देणे किंवा तिला सुखात ठेवणे असे आहे. खरे पाहता या गोष्टी आपण महिन्यातून किती दिवस करतो ? आजकालच्या गडबडीचा जीवनामध्ये आपण किती वेळा चार-पाच दिवसांसाठी बाहेर फिरायला जाऊ शकतो? आर्थिक अडचणी असतात, ऑफिसमधून सुट्या मिळत नाहीत. मुलांच्या शाळा आणि त्यांचा अभ्यास. अशा अनेक अडचणी पुढे उभ्या आहेतच.

कधीतरी वर्षातून एक दिवस आपण बाहेर जातो तिथेही ‘नवरा-बायकोला’ एकांत असा मिळतच नाही. कारण मुलांना घरी सोडून यांचा पाय बाहेर पडतच नसतो. बाहेर फिरवून आणले म्हणजे माझे काम झाले यात धन्यता मानणारे नवरे मंडळी आहेतच. पण बायकोची इच्छा काय आहे ? याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. बायकोला साडी आणणे नक्कीच चांगली गोष्ट आहे पण बायकोच्या हातात ती साडी पडल्यावर जो आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो तो किती वेळ राहतो? मग नक्की बायकोची अपेक्षा काय आहे?.

💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋

❤️ तिला हवा असतो नवऱ्याचा वेळ. नवऱ्याचे प्रेम आणि त्याचा जास्तीतजास्त सहवास. ❤️

💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋

जरा विचार करा, ऑफिसमधून घरी आल्यावर ज्यावेळी बायको दार उघडते आणि आपण आत जातो आणि आत गेल्यावर तिला प्रेमाने जवळ घेऊन एक गळाभेट ज्याला आपण जादू की झप्पी म्हणतो देऊन बघा. कोणी याला चावटपणा म्हणेल. जरी हा चावटपणा असला तरी नवऱ्याने असे प्रेमाने जवळ घेतल्यावर जो तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो दहा हजाराच्या साडीमध्ये सुद्धा नसतो. बायको किचनमध्ये स्वयंपाक करत असते त्यावेळी किचनमध्ये जाऊन तिच्या पाठीमागे उभारून प्रेमाने मिठीत घेऊन विचारा

“सांग, मी काय मदत करू’

बघा या चावटपणामुळे तिचा चेहरा किती खुलतो. घरी एखादा कार्यक्रम असला की सगळे घरी असतात. घरातल्या बायका नटून-थटून ज्यावेळी येतात त्यामध्ये आपली बायको सुद्धा असते. अशा वेळी सगळ्यांच्या समोर तिच्या पुढे जाऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन तिला म्हणा …

“आज तू खूप सुंदर दिसत आहेस”

बघा या चावटपणामध्ये किती आनंद आहे. कधीतरी अचानक ऑफिसला सुट्टी घ्यायची आणि बायको ज्यावेळी जेवणाचा डबा ऑफिसच्या बॅगेत ठेवत असते त्यावेळी तिच्या जवळ जाऊन थोडासा नटखट चेहरा करून तिला म्हणा….

“आज ऑफिसला सुट्टी घेतली आहे, बोल काय प्लॅन?”

बघा या सर्प्राईजचा आंनद तिला किती होतो. रात्रीचे जेवण झाल्यावर नवऱ्याचा हट्ट असतो की बायकोने त्याच्याबरोबर वॉकला बाहेर जावे.पण त्या बिचारीला दिवसभर काम करून जो कंटाळा आलेला असतो त्यानंतर अजून चालण्यात किती इंटरेस्ट असतो हे समजून घेतले पाहिजे. जेवण झाले की मस्त चार-पाच किलोमीटर मोटारसायकलवर बसवून एक राईड मारून या आणि बघा तिला किती आनंद मिळतो ते. एखाद्या कार्यक्रमामध्ये उगाच बायकोला चिडवणे,तिचे केस विसकटने, तिच्या केसांमधली पिन काढणे असा चावटपणा करून बघा किती मज्जा असते ती. मोटारसायकलीवरून आपण जात असताना एखाद्या सिग्नलला थांबले की तिचे दोन्ही हात धरून पुढे ओढा आणि म्हणा…

“आग सर की पुढे लाजतेस काय!!”

बघा तिच्या लाजण्यात किती आनंद असतो ते. एखाद्या रविवारी घरामध्ये असताना एखाद रोमँटिक गाणं लावून जमेल तसा डान्स करून बघा काय आंनद असतो तो. कधीतरी तिच्या कॉलेज किंवा शालेय जीवनातील गमतीजमती तिला हटकून विचारा आणि मग ती ज्यावेळी तिच्या आठवणी ओठांवर हास्य ठेवून सांगेल आणि सांगत असताना तिला त्या आठवणीतून मिळणार आनंद काय असतो हे पहा. हलक्या-फुलक्या कारणांवरून जेव्हा भांडण होते त्यावेळी हळूच एक पत्र तिच्या कपाटात ठेवून बघा. घरी आल्यावर तिला तिचा दिवस कसा गेला विचारा आणि मग तुम्हालाही समजेल बायको दिवसभरात संसाराचा गाडा हाकताना किती बारीक सारीक गोष्टी करत असते. घरातल्या घरात कधीतरी प्रेमपत्र लिहा, आणि त्या पात्रातून जो आनंद मिळतो तो एकदा अनुभवून पहा.

नवऱ्याला जेव्हा सुट्टी असते तेव्हा तिच्या आधी उठून घर आवरून तिला बेड-टी देऊन तिच्या गॉड ओठांवरील ते गोड हसू एकदा पाहून बघा. तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या भावंडाना कसे मोठे केले याचे अनुभव कधीतरी तिला विचारून पहा. कधीतरी तिला गावाकडे घेऊन जा आणि गावाकडच्या बाजारात अगदी लहान मुलांसारखे दोघे फिरून पहा. स्वतः तिला ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जा आणि नंतर ज्यावेळी तिचा गोड चेहरा दिसतो त्यावेळी डोळा मारून ….

‘एकदम हॉट दिसत आहेस’ असे म्हणून बघा.

कधीतरी जरा वेस्टर्न स्टाईल ड्रेस आणा, नक्कीच ती म्हणेल ‘आहो असलं कुठं घालायला मिळणार आहे’ मग ….

‘आग काहीतरी दोघेच घरी असताना घरातल्या घरात घाल ना’ (हे म्हणत असताना जरा डोळ्यामध्ये चावटपणा ठेवा) असे म्हणून बघा. तो ड्रेस मग कुठंतरी लपवून ठेवण्यासाठी चाललेली तिची धडपड बघा.

💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋
आणि सर्वात महत्वाचे, सकाळी घरातून बाहेर पडत असताना तिचा सुंदर ओठांना तुमच्या ओठांचा एक स्पर्श देऊन पहा दिवसभराचा आनंद आणि प्रसन्नता किती असते ती.
💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋

अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला आपण नवरा-बायकोच्या प्रेमाच्या नात्यामधील चावटपणा म्हणू शकतो जो आपल्याला रोज एक वेगळाच आनंद देऊन जातो. आणि हा नक्कीच गरजेचा आहे. वर्षातून एकदा फिरायला जाणे, दिवाळीला साडी घेणे अशा नियोजित जीवनापेक्षा आपल्या रोजच्या जीवनाला असे सर्प्राइजेस देऊन रोज जगण्याचा आनंद घेण्यात जो मजा आहे तो दुसऱ्या कशातही नाही.

आणि हो, नवरा-बायको म्हणलं की नक्कीच भांडण असते, कधी लहान तर कधी मोठे… मोठे भांडण झाले की पुरुषी अहंकार बाजूला ठेवून … तिच्या जवळ जाऊन तिला सॉरी म्हणून एक किस करा बघा बायकोच्या डोळ्यात जरी पाणी आले तरी त्या अश्रूंमध्ये खूप आनंद असतो ☺️

कारण,

One Kiss Can Change Your Life, Provided That “You Know How To Kiss Your Woman” 😉😉

ज्यावेळी बायको म्हणेल “तुम्ही पाहिल्यासारखे रोमँटिक राहिला नाही” या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नवरा-बायको या नात्यांमधला चावटपणा.

Happy Valentine’s Day !!

Love your Woman !!

– प्रबल.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

1 comment on “नवरा-बायको : चावटपणा महत्वाचाच.Add yours →

  1. पाटील तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर असेच लिहीत रहा..तुम्ही या गोष्टी कश्या कमवल्यात माहित नाही..
    खरंच नुसतं लेखन शब्दांच्या बळावर उंचच्या उंच भरारी मारल्याने वाचणारा कंटाळून जातो.
    तुम्ही लिहिलेलं सामान्याला कळतं आणि पटतं,
    तो या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.
    यासाठी तुम्ही खुप लिहावं. तुमच्या लिखाणातून खुप प्रेरणा मिळते.
    मनापासून धन्यवाद.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *