promo252033836

कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं

👄👄👄👄👄👄👄👄👄👄👄👄👄

कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं
👄👄👄👄👄👄👄👄👄👄👄👄👄

महत्वपूर्ण सूचना: खाली दिलेल्या मजकुराचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. जर संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

होतो थोडा ऑफिसमधून घरी यायला उशीर, तू दार उघडतेस. अंदाज असतोच की तू चिडली असणार आणि हो, तू चिडलेलीच असतेस. तू दार उघडतेस, बारीक डोळे करून रागाने पाहत असतेस, मी आत येतोच तोवर पाठ फिरवून आतमध्ये जोरात पाय आपटत जात असतेस… मी मागे-मागे येत असतो, सॉरी… म्हणत असतो, मग तू माझ्याकडे वळून बरच काही बोलत असतेस, खर सांगू? मला काही ऐकूच येत नसतं.

👄 कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं …

सकाळी उठलीस की किचन कट्टा तुझी वाट पाहत असतो. गॅसवर भाजी, चपातीचा तवा, पुढे पळपुटं… एका बाजूला तू चपात्या लाटत असतेस, दुसऱ्या बाजूला तव्यावरची चपाती पलटत असतीस, मध्येच भाजीकडे लक्ष असते… लेकराच्या शाळेची पाण्याची बाटली धून घेत असतेस, स्वयंपाक होईल तसा लेकराचा आणि माझा जेवणाचा डबा भरत असतेस. आणि सकाळी नाष्ट्याला अंड्याचं ऑम्लेट तव्यावर टाकलेले असते, ब्रेड भाजत असतेस. चपाती तव्यावर टाकून नाष्ट्याची प्लेट हॉलमध्ये आणून ठेवतेस. ही सगळी तुझी सकाळची धावपळ सुरू असते पण मला हे काहीच दिसत नसत.

👄 कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं …

लेकराचा अभ्यास तू घेत असतेस. लेकराला सगळं नीट समजावं म्हणून जीवाचा आटापिटा करून तू त्याला शिकवत असतेस. त्याला शिकवता यावं म्हणून तू पहिला सगळा अभ्यास करतेस. त्याला सगळं समजलं याची खात्री करून घेत असतेस. खरच तू खूप कंटाळलेली असतेस, पण लेकरू कुठं कमी पडू नये म्हणून सगळा कंटाळा बाजूला ठेवून तू त्याचा अभ्यास घेत असतेस. तुझी तळमळ, तुला होणारा त्रास खरच मला दिसत नाही गं …

👄 कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं …

घरी पाहुणे आले की सकाळी तासभर आधीच उठाव लागत तुला. कुणाला चहा तर कुणाला गरम दूध. कुणाला पोहे तर कुणाला उपिट. सगळ्यांना गरम पाणी काढून द्यायचं. ते अंघोळीला गेले की त्यांचं अंथरून-पांघरून गोळा करून ठेवायचं. घरकाम करणारी मावशी उशिरा येणार म्हणून सकाळी घरभर केरसुनीचा एक हात तू मारून घेतेसच. अचानक दूध संपत आणि जशी तू माझ्या जवळ येऊन हळूच “दूध संपल, तेवढं लवकर आणा” हे सांगत असतेस… तेव्हा मला होणारा आनंद वेगळाच असतो …

👄 कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं …

ज्यावेळी आपल्यात भांडण होते त्यावेळी तुझ्या मनात चाललेली खळबळ तुझ्या चेहऱ्यावर दिसत असते, नंतर ज्यावेळी मी तुला सॉरी म्हणतो त्यावेळी तुझ्या डोळ्यात असणारे अश्रू मला कधीच दिसले नाहीत गं ….

👄👄 कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं,
कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतं !!! 👄👄

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “कारण माझं लक्ष फक्त तुझ्या ओठांवर असतंAdd yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *