जाता-जाता

 

आजकाल देशामध्ये एका ठराविक जातीवर अत्याचाराचे सत्र सुरु आहे, कारणे वेगवेगळी आहेत. पण अत्याचार हा कुणा समाजावर नसतो होत, तो होतो एका वृत्तीवर. लोकशाहीच्या नियमाने कोणी कुणावर अत्याचार करू शकत नाही आणि तो कायद्यानाने गुन्हा आहे. जर गुन्हा असेल तर त्याला शिक्षाही नक्कीच असणार. शिक्षा करायची म्हणजे न्यायालय, कोर्ट-कचेरी, तारखा ही सगळी नाटकं वर्षानुवर्षे चालणार.

असो …

त्यावर पंतप्रधानासारख्या माणसांन
“गोळ्या घालायच्या तर मला घाला, दलितांना नको” हे विधान नक्कीच कोणत्याही नेत्याला शोभत नाही. आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांसारख्या माणसाचे नाव तुम्ही घेता तर तुम्ही “शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केले असते” हा विचार केला तर कदाचित एका झटक्यात हा विषय मार्गी लागलं.


 

कारगिल विजयी दिवस :

दिवस तसा आज आनंदाचा पण, दुःखांच्या हजार डोंगरांची चढाई केल्यावर हा आनंदाचा श्वास मिळतो, आपण जिंकलो, जल्लोष झाला, हुतात्मा झालेली लोक स्मरणात आहेतच …. शेजारच्यांना हरवण्याचा आनंद हा वेगळाच असतो …
पण एक पती, एक बाप म्हणुन काही गोष्टि सारख्या काळजात रुततात,
नवरा घरी यायच्या वेळेत नाही आला आणि त्याचा फोन लागत नाही तर बायकोच्या नरड्यातन पाणीसुद्धा खाली उतरत नाही ओ, लेकरु हजारवेळा तिला विचारत, आई-आई पप्पा कधी येणार ?
ह्या वाक्यांच दुकन हे न विसरणार आहे. आणि हे ओझ घेऊन आयुष्य जगणाऱ्या त्या महान आई आणि लेकरांना माझे खरे दंडवत, बाकी जल्लोष तर आहेच.
पण काही प्रश्न तसेच आहेत.


 

शिवाजी महाराज, या पृथ्वीतलावर एकमेव मनुष्य आहेत जे प्रत्येक जातीचे सिद्ध होत आहेत.

फक़्त आता मंगळावरन सिग्नल नासाला मिळणा म्हणजे बर नायतर एलीयन म्हणुन सुद्धा सिद्ध होतील.

च्या आयला आडानचोट इतिहासकार ….


जो इतिहासकार इतिहासाचा अभ्यास वर्तमानकाळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिति बदलण्यासाठी करतो आणि इतर तरुणांना प्रेरणा देतो, तो खरा इतिहासकार.

बाकी सगळे मग, ढिंच्याक ढीच्याक ….. ढिंच्याक ढीच्याक


परवा Omkar भाऊनी कसरत करणार्यांसाठी खुराक सांगितला, मी जरा लेकरांसाठी सांगतो.

मुलांना दुधात रोज बोर्नविटा देतात, अर्धा किलो बोर्नविटा २२० रुपयाला येतो जे लहान मूल दहा दिवसात संपवतात आणि त्यामध्ये मुलांच्या वाढीसाठी लागणार आस काही नसत.

आता, २५० रूपयात अर्धा किलो बदाम येतात, मिक्सरमध्ये त्याची पावडर करा आणि त्यात अगदी थोड़ जायफळ टाका आणि वाईस साखर. आता हे दुधातन लेकरांना द्या.

तुम्हीच ठरवा दोनीमदल कोनत फायदेशीर आहे.

ही कला आमच्या बाईसाहेब मनीषा प्रशांतराव लवटे-पाटील यांची.

माझी आणि शिवबाची बुद्धि वाढन्यास मदत होईल


जब में अपना चेहरा आयीनेमे देखता हु तब मुझे ही मेरी घीन आने लगती हे |

अरे इतिहासकारों मेरे आथित का कुछ तो खयाल करो. खुद की लाल करनेके लिए मेरा मुह क्यू काला कर रहे हो |

– इतिहास


|| छत्रसाल दर्शन पत्रिका – 2016 ||
———————————————

13394056_10154109894740295_156986241816335388_n

प्रशांतजी, इस साल हमने छत्रसाल दर्शन पत्रिका के मुखपृष्ठ पे महाराष्ट्र के भाईंयोने दिया हुवा छत्रसाल जी का पेंटिंग का फोटो छपवाया हे.

पुरे बुंदेलखंडने इस चित्र की खूब प्रशंसा की, ख़ास करके मराठोंने हमारे राजा की ये तस्बीर बनाई हे इसका हमे गर्व हे |

शायद इसीको हम छत्रपती शिवाजी महाराज और महाराजा छत्रसाल बुंदेला का आशीर्वाद मानते ये जिन्होंने हमे और आपको मिलाया |

हमारी इच्छा हे की आप सभी एक बार बुंदेलखंड आये |
————————————————————-

हा माणूस बोलत होता आंगावर काटा येत होता. आज चेस्ट न मारता छाती 10 इंच वाढली.

बोम्बल्या फकीर, कशी तारीफ़ करू आपली


कधीकाळी या देशात, मागासलेल्या आणि मुर्ख रूढ़ी-परंपरेमध्ये अडकून राहलेल्या समाजामध्ये एक अतिशय “शिस्तप्रिय, व्यवहारिक, राजकीय, चतुर, हुशार” असा माणूस होवून गेला ज्याने या देशाला एक नवीन वळण दिले आणि जगापुढे एक आदर्श ठेवले व अतिशय यशस्वी जीवन जगले व आभाळाची ऊंची प्राप्त केली.

याच माणसाच्या अनुयायांनी त्या माणसाला एवढे भावनिक केले की त्याचे पूर्ण कर्तुत्व म्हणजे संवेदनशील विषय करुण टाकला. त्या माणसाच्या आयुष्यातील हरएक घटना म्हणजे बाजार करुण ठेवला. त्या माणसाच्या आयुष्याशी सबंधित प्रत्येक गोष्ठ वादग्रस्त करुण ठेवली. आणि एका व्यवहारिक माणसाचा बदल भावनेत करुण आज जनता 100 फुट खाली डबऱ्यात गेली.


योग्य व्यक्तींपर्यंत योग्य निरोप पोहचावा हीच अपेक्षा
—————————————————————

जंगल असते आणि जंगलात चार प्रमुख खतरनाक प्राणी असतात, ते म्हणजे सिंह, वाघ, बिबट्या आणि चित्ता. वाघ म्हणजे वेगळाच विषय. त्याच वेगळच चाललेल असत पण चित्ता, बिबट्या आणि सिंह हे मात्र आजुबाजुलाच आणि बऱ्यापैकी एकमेकांशी सबंधित मंडळी.

आता हे आपआपल्या कौशल्यात तरबेज, चित्ता, ताकतीने कमी वजन पण ६० किलोच्या आसपास वेग तर विचारू नका पण लयतलय १०० मीटर पळू शकतो. बिबट्या हुशार आणि कडु माणूस. गपकण रात्री शिकार करणार झाडावर घेवून जाणार आणि इज्जतीत खात बसणार. सिंह म्हणजे काय बाप माणूस. यांच्या नादाला कोण लागणार.

जंगलात होत कस, चित्ता एका हरणाची शिकार करतो, आता तो एवढा पण ताकतवान नसतो की ते मेलेल हरिण कुठतर वड़त न्यायच आणि खायच. जीत मारलय तितच त्याला खाव लागत. आता जंगलात शिकार झाली ही बातमी पूर्ण जंगलभर करणारी मंडळी म्हणजे गिधड़. जीत गिधड़ जमा होतात तित सगळे जमा होतात कारण कायतर खायला मिळणार ते ही आयत. चित्ता खातच असतो तोवर मग बिबट्या येतो, ताकतीच्या जोरावर तो चित्त्याला पळवतो आणि खायला सुरु करतो. जरा वाईस खातो तोवर सिंह येतो. बिबट्या आपला गपगुमान कड़कड़न निघतो. आणि सिंह ते हरणाच मृत शरीर खायला सुरु करतो.

या भानगडीत कुणालाच पोटभर खायला मिळत नाही.
प्रश्न हा आहे की हरणाच्या मरणान कुणाचा फायदा झाला का?

चूक मरणाऱ्याची की मारणाऱ्याची. का मग नियातीची ??


स्वराज्याचा पहिला नियम,

“रक्कम हाय तर भक्कम हाय”


भुतकाळ आणि इतिहास हा विषय समजून घ्या. या गोष्टि घडून गेल्या आहेत. आपण डोंगरावरून चंद्रावर आलो आहोत. इतिहासातल्या कोणत्या गोष्टी घ्याव्यात आणि कोणत्या सोडाव्यात हे समजन्याइतके जानकार आहोत आपण. इतिहासामुळे वर्तमान खराब होवू नये याची काळजी घ्या.

ज्याला जे योग्य वाटेल ते नक्कीच कराव. कुणाचे खरे-खोटे करत बसुन आपापसात भांडण योग्य नाही. असे असेल तर मी म्हणीन तुम्हा कुणालाच महाराज कळले नाहीत आणि इतिहास ओळखता आला नाही.

बाकी तुम्ही जानकार आहात.


कस असत बघा मानसाच …

“गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी गेल की गाव आपल वाटतं,
तालुका सोडून शहरात जा, तालुका आपला वाटतो,
राष्ट्र सोडून दुसऱ्या राष्ट्रात जावा, आपल राष्ट्र चांगल वाटतं,
देश सोडुन दुसऱ्या देशात जावा, आपला देश चांगला वाटतो,
ज्यावेळी पृथ्वी उंच आकाशातून विमानात बसून पाहतो तेव्हा ही पृथ्वी आपली वाटते.”

नेमकं आपल काय हाय आणि नाय


समाजात एखाद्या माणसाविषयी त्याला ईश्वरी अवतार समजण्याइतकी पूज्यता का निर्माण व्हावी ?

335 वर्ष्यानंतरही, महाराज होते … ऎसे मनात न येता, महाराज गडावरच आहेत ऎसे का वाटते?

खरच दाखवा हो ऐसा माणूस जगाच्या इतिहासामध्ये … कितीबी वेळा गडावर जावा … नुसत पुढ उभारल की डोळे आणि छाती दोनी भरून येतात राव.

का नाद नसावा या युगपुरुषाचा !!


आसच कुठतर वाचल होत, जरा मी बदल करुण माझ्या भाषेत सांगतो, नक्की वाचा …

जंगल असते, जरा जास्तच मोठे, एका टोकाला एक वाघ आणि गाढव म्हणायला फक़्त मित्र असतात. गाढव वाघावर लय जळत असत. दोघांचा पण डोळा जंगलाच्या दोन महत्वाच्या ठिकानानंतर एक मोक्याच ठिकान असत त्यावर असतो. दोघेही एक डाव मांडतात. जो पहिला तिथे पोहचेल तो त्या भागाचा राजा ठरेल. आणि शर्यत सुरु होते.

या स्पर्धेच्या निकाल अतिशय खळबळजनक लागतो. आणि गाढव जंगलाच्या त्या भागाचा “राजा” बनतो.

वाघ गाढ़वाला म्हणतो. जर वाटेत असलेल्या दोन भागात आमच्याच प्राजातिन आडवून पायगोवा टाकला नसता तर मीच जिंकलो असतो आणि “राजा” झालो असतो.

संगायचा मुद्दा एवढाच : आपल्याच लोकांचा आपणच पायगोवा बनु नका नाहीतर गाढव राजा झाल्याशिवाय राहत नाही.


“निष्कर्ष” काढून इतिहासाचा आभ्यास करण्यापेक्षा,
“अभ्यास” करून निष्कर्ष काढा :)


१७ व्या शतकापासून न सुटलेले कोड़े, अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा ते म्हणजे,

“आपल कोण आणि परक कोण”


“मुलगा” म्हणुन अभिमान असावा असा,
“पती” म्हणुन अभिमान असावा असा,
“पिता” म्हणुन अभिमान असावा असा,
“पराक्रमी” म्हणुन अभिमान असावा असा,
“राजा” म्हणुन अभिमान असावा असा,
“देशभक्त” म्हणुन अभिमान असावा असा,
“प्रतिभावंत” म्हणुन अभिमान असावा असा,
“विद्वान” म्हणुन अभिमान असावा असा …

आमचा राजां …. “शंभु राजा”..


आज एकाने msg करुण विचारले,

“दादा गुढीपाडवा आणि संभाजी महाराज नक्की काय संबंध?”.

बाबा म्हणल पाया पडतो तुझ्या पण मला माफ़ कर आसल काय माहीत नाय मला. एक विचारतो तेवढ सांग.

म्हणला काय ?

तुझ्यापुढ “गु” आणि “गुलाबजाम” आहे काय खाणार ?

म्हणला गुलाबजाम !!

मग बाबा इतिहासातल चांगल घे आणि चांगल काय करता येतय का बघ की.

आपल्या देशापुढ काय कमी प्रोब्लेम्स आहेत का ..


बऱ्याच वेळा मी काही म्हणी ऐकल्या आहेत जश्या …
एका म्यानेत दोन तलवारी कश्या बसतील ..
एका टीम मध्ये जास्त लीडर झाले की, कामाचा सत्यानास झाला म्हणुन समजा ..

पण ज्यावेळी शिवकार्यासाठी आम्ही सगळे जमा होतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी आक्कल पाजळून काहीतरी आपल् शब्दांचा खेळ करून हुशारी गाजवन्याचे प्रकार आहेत हे सिद्ध होते .

सगळे लीडर अगदी जिव ओतून काम करतात, सर्वजन सगळ्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतात, एखाद्या गोष्टीवर कोण सहमत नसेल तर अजिबात कोणी एकमेकांवर रागवत नाहीत किवा बोम्बाबोम्ब करत नाहीत, सगळे मिळून पक्क्या गोष्टीवर सहमत होवून खांद्याला खांदा लावून काम करतात ..

10561731_10153132450140295_8749605912626499412_n

“शिवाजी महाराज” या शब्दात किती ताकत आहे,
किती आस्ता आहे, किती भावनिक शक्ति आहे हे सिद्ध होते


 

लोग कहते हे की तुम किस्मतवाले हो,
क्या बताए इन नादानोंको,

हम भगवानसे प्रार्थना करते रहते की हमारी जैसी किस्मत किसीकी ना हो !!!


जीवनात आजुबाजुला लय बाजू असतात,
एका बाजूला लाखो किलोमीटर अंतर कापून आमच यान मंगलावर गेल, दुसऱ्याबजुला एक घागर पाणी आनायला 8-10 किलोमीटर चा प्रवास आहे. डोसक्यावर 40 डिग्री उन आहे.

गावात सगळी लोक एकत्र येवून आता पुढ काय करायच, प्यायला पाणी कुठून आणायच यावर काय उपाय निघल का बघतात, शहरात मोठमोठ्या क्लब मध्ये होळी साजरी करत सोफेस्टिकेटेड लोक जीवनाचा आनंद साजरा करत आहेत. (कोरडी होळी)

काही रिच सोसायटीमधील लोक अर्धा तास लाइट गेली की विज मंडळाची आई बहिन एक करत आहेत कारण घरी झोप येत नाय AC बंद असला की, दुसऱ्याबाजूला घरात फक़्त 30 मिनिटासाठी बल्ब लागतो.

घरात गार पाण्याचा माठ, फ्रिजमध्ये 4-5 पाण्याच्या बाटल्या नसल्या की खुप त्रास होतो शहरी लोकांना पण दुसरीकडे प्यायला पाणी मिळावे एवढीच माफक इच्छा.

भारतमातेच अर्थ काय आहे काय माहीत, तरिपन भारत माता की जय !!!


२३ मार्च ….

पुन्हा एकदा तोच प्रश्न, इतिहासाकडे कसे पहायला पाहिजे आणि इतिहासाचा अभ्यास का करायला पाहिजे. एका बाजूला असे लोक (इतिहासकार) आहेत जे असे प्रश्न उभे करतात ज्यावर आज चर्चा करून उपयोग नसतो. कारण मेलेल्या म्हशीचे कितीही पिळले तर दुध येत नसते. भगतसिंह, सुकदेव आणि राजगुरू यांची फाशी गांधीजी रोखू शकले असते का नाही रोखले ? त्यांनी जाणूनभूजून स्वताचे राजकीय महत्व टिकवण्यासाठी असे केले वगैरे वगैरे ….

यातून भगतसिंह, सुकदेव आणि राजगुरू यांचे बलिदान बाजूला राहिले. एवढ्या कमी वयात त्यांनी एवढे केले की इथून पुढे जोवर पृथ्वी असेल किंवा पृथ्वीवर मानव असेल तोपर्यंत हे लोक स्मरणात राहतील. तारुण्य काय असते तारुण्यात राष्ट्रभावना काय असते आणि आज याच भावनेची आपल्या देशाला गरज आहे. सामाजिक बांधिलकी, समाज प्रभोधन किती महत्वाचे आहे हे आपणास माहीतच आहे. मग भगतसिंह, सुकदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिवस म्हणून तरुण असे काही शिकू शकतील जे आज कामी येईल. इतिहासकारांना त्यांचे काम करू द्या कारण असे मुद्दे उपस्थित केल्याशिवाय त्यांची पुस्तक खपत नाहीत.

ज्यातून समाजाचे आजचे प्रश्न सुटतील असेच धडे इतिहासातून घ्यावेत आणि शिकावेत. बाकीच इतिहास म्हणूनच पहाव.

म्हणून भगतसिंह, सुकदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिवसानिमित्त तर आपण तरुण मंडळींनी आपल्या देशाला राष्ट्रभावना असलेले तरुण पाहिजेत जे आज लाखो भारतीयांचे स्वप्न आहेत. भागातसिंह यांनी म्हणले होतेच ना …. की पुढची पिढी समजूतदार आणि देशप्रेमी निघेल असे काहीतरी आपण केले पाहिजे. मग आता समजून घ्या त्याना काय म्हण्याचे होते आणि आपण काय केले पाहिजे.


हमारा जुनून ही इतना था की, हमने आसमान को भी चुनोती दी थी,
पर कम्बक़्त ये तकदीरही हमारा रास्ता रोके खडी थी ||


हिशेब कसा लावावा ?
————————–

भारताचा ७०% भाग हा शेतकऱ्यांचा आहे म्हणजे जमिनीवर राहणारी माणस, आणि ३०% अशी लोक आहेत जी Digital India च्या स्वप्नात राहतात.

त्यामध्ये काहींना मंदीमुळे नोकरीची चिंता आहे कारण ब्यांकेचे हफ्ते आहेत. काहींना उद्योगधंद्याचे टेंशन आहे कारण आयुष्यात खुप प्रगती करायची आहे. केल पाहिजे हा ही एक विकासाचा भाग आहे. पण जी आज परिस्थिति आहे त्यासाठी कोणीतरी मागे सरकल का?

कारण ७०% लोकांना आज प्यायला पाणी कुठून आणायच हा प्रश्न आहे. आहो आपणास २ वेळच अन्न तर मिळते हो, नोकरी गेली तर मिळेल हो, धंदा थंड झाला तर उद्या पुन्हा गरम होईल ओ …

पण ही जमिनीवर राहणारी माणस पाणी मिळाल नाही म्हणुन मेली तर पुन्हा येतील का.

आपणास पाणी गोड लागल का?

ही वेळ मागे राहिलेल्याच्या पाठीमागे उभी रहायची आहे. जे काही करू शकतो ते करू पण शेतकरी जगला पाहिजे नाहीतर आपल्या जगन्याला अर्थ नाही.


होळी किंवा रंगपंचमी साजरी करण्याआधी चार दिवस एक गृहपाठ करा, बिल्डिंगच्यावर जी पाण्याची टाकी असते ती सकाळी 6 ते 10 बंद करा आणि होणाऱ्या वेदना अनुभवा ….

कदाचित पाण्याचे महत्व समजल आणि जिथे 8 दिवसातून एक वेळ पाणी येते ते ही अर्ध्या तासासाठी त्यांची होणारी तळमळ समजल.

बाकीचे शहानपण बाजूला ठेवून आपण माणस आहोत आणि माणसांचा विचार केलाच पाहिजे.

कृपा करुण पाणी वाया घालवु नका. जगाच्या दुःखापुढे आपली सारी दुःख कवडीमोलाची आहेत ओ …

गावाकडच्या लोकांना फार अपेक्षा आहेत आपल्याकडून कारण त्यांचे म्हणणे आहे शिकलेली माणस आहेत जी आपल्यासाठी काहीतरी करतील.

बघा एवढं तरी जमतय का !!!


मानवहिताचा एक सिद्धांत आहे, की जर तुमच्यामुळे कुणाचा फायदा होत नसेल तर निदान नुकसान तर करू नये, तुमच्यामुळे कुणाच्या जीवनात आंनद येत नसेल तर किमान दुःख तर देवु नये.

पण दुर्दैव असे की, आजकाल लोकं त्यांच्या दुखांपेक्षा दुःखी कमी आणि शेजारच्यांच्या सुखाने दुःखी आहेत.

मग मनुष्य आपल्या दुखांवर पर्याय काढण्यापेक्षा दुसऱ्यांच्या सुखात बाधा कशी आणता येईल यामध्ये पूर्ण लक्ष देतो आणि आपली पूर्ण ताकत लावतो. आणि मग मनुष्यजातीला न शोभणाऱ्या कृती तो करतो ज्यातून फक़्त नुकसान होत असते.

प्रश्न असा आहे की मनुष्याने जर मनुष्यासारखे वागणे सोडले तर मनुष्य म्हणुन जन्माला येन म्हणजे पाप ठरू शकते असे नाही का ?

असाच पडलेला एक प्रश्न 😊


|| जागतिक महिला दिन ||

आजवर बऱ्यापैकी लिहिले आहे, तसा मी ना लेखक ना मोठा अभ्यासक आहे पण जे मला वाटतं ते मी लिहित असतो.

आई, हा विषय हातात घेतला की पेन पण डोंगरासारखा वाटू लागते, आईसाठी काय लिहायच आणि कस लिहायचे तिचे व्यक्तिमत्व शब्दात मांडण्यासाठी शब्दतर कुठून आणायचे. आणि आईला शब्दात मांडण्याएवढा खरच मी मोठा झालो आहे का ?

हां पण आईने दिलेल्या आठवणी नक्कीच शब्दात मांडू शकतो, जग खुप पुढे गेल हो, माणसांची जागा आज तंत्रांनी घेतली आजुबाजुला एवढी लोकं असताना सुद्धा का कुणासठाऊक जीव गुदमरल्यासारखा होतो, तोंड बघुनच त्या माऊलीला लेकराची अवस्था जाणवते पण आज सांगूनसुद्धा कुणाला कळत नाही हो … बारकं आसताना गल्लीत कुत्र जरी मोठ्यांन भुकल की आईकड पळून जायचो आणि तिच्या कुशीत मोठ्यातलीमोठी भीती सुद्धा पळून जायची कारण त्या भीतिला माहीत असायच की हे लेकरु आज जगातल्या सर्वात ताकतवान व्यक्तीच्या कुशीत आहे.

आईच्या मांडीवर डोक ठेवून झोपलो की जे सुख मिळायच त्याची बात काय न्यारीच होती पण आज मखमली गाडीवर झोपताना सुद्धा डोळे उघडूनच झोपतो आणि मग आईच्या आठवणीत रमत रमत थोड्या वेळासाठी मरून जातो.

माहीत नाही का शिकलो आणि आयुष्यात काय करणार आहे पण या प्रपंचामुळ आईची साथ सुटली, लोक म्हणतात मूल मोठी झाली की आपल्या पायावर उभ राहतात आणि या घाईगड़बडीच्या जगात एवढी पुढ जातात की आई खुपच माग राहून जाते ओ … कधीबी त्या माऊलीला फोन करा “तू बरा हाइस ना” या वाक्याच्या पुढ तीज काय बी म्हणन नसत हो… पण कस सांगायच तीला की आजबी तिच्या कुशीची आणि डोक ठेवून तासभर झोपायला तिच्या मांडीची गरज आहे. आयुष्यातली दुःख तिला सांगाव तर तिला भाकरी गॉड लागायची नाही म्हणुन तिला सांगत नाही दुर्दैव म्हणजे, आंधारात हरवलेली वाट दाखवायला तिच बोटच पाहिजे हेही तिला सांगू शकत नाही.

काय दुखत असल तर थांबून चालत नाही, तब्येत बिघडली की स्वताच स्वताला दवाखान्यात घेवून जायच का कुणासठावुक ही वेळ कशी आली, आजही आठवतय आंगात जरा ताप भरला की रातभर मांडीवर डोसक घेवून भिजल्याल्या कापडाच्या घड्या रात्रभर घालायची, रात्रीच्या आंधारात तिच्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची. आजमात्र सगळीकड आंधार आहे पण ……

पायाला ठेच लागली की आईजवळ जावून मनसोक्त रडायचो, प्रेमानं माऊली जवळ घ्यायची विचारपुस करायची निम्म दुखन तितच बर वह्याच … आज दुखन कुणाला सांगाव … कुणापाशी जावून रडाव … आयुष्यातली प्रगती आणि प्रपंच एवढा महत्वाचा झाला का ओ की आईपासून लांब जायच … माहीत नाही पैसे मिळवून सोन्याच्या घास खाणार आहे का नाही पण त्या माऊलीच्या हातान मायेचा एक घास पन आज महाग झाला …

असो, आज महिलादिन आहे पण आईसारखी महिला या जगात कुणी नाही … भावनिक शब्द कमी येतात माझ्या तोंडून पण काय कराव माणूस म्हणल्यावर जरा जिव गुदमरणारच की


मनुष्याने आपल्या अंत:सृष्टीवर आणि बाह्यसृष्टीवर उमटवलेल्या संस्कारमुद्रांचे एकवटलेले प्रकटीकरण म्हणजे संस्कृती, आणि प्रकटीकरण्याच्या प्रक्रियेला संस्कार असे म्हणतात. त्यामुळे संस्कार आणि संस्कृती ह्या दोन गोष्टी संलग्न आहेत. साडे तीन जिल्हा असे विचार येणे म्हणजे ही इतिहासकारांची एक वृत्ती आहे जी यांच्या संस्कारातून जन्माला आली आहे ज्यावरून त्यांची संस्कृती दिसून येते त्यामुळे या त्यांच्या संस्कृतीमुळे कोणताही अविष्कार होणार नाही. त्यामुळे अशा संस्कारी इतिहासकारांना इतिहासाच्या वेशीच्या बाहेर ठेवणे यातच देश्याचे हित आहे.


जीवनात आलेल्या माणसांना कधीच पर्याय नसतो. असते ती तडजोड…. कोणीही कितीही चांगला भेटला तरी गेलेल्या व्यक्तीची कमी भरून काढू शकत नाही…. नवीन येणारी माणसे आधीच्यांपेक्षा जास्त सुख देत असतील कदाचित पण माणूस फक्त सुखातच मोजता येत नाही ना?? त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, त्याचा सहवास, ती व्यक्ती नसण्याचे दु:ख सारं युनिक असतं, ते परत कधीच मिळू शकत नाही.
नवीन आलेल्या व्यक्तींसोबत अगदी तशाच प्रकारचा प्रसंग आला कि आपल्याला जुन्या व्यक्तींची आठवण येणं साहजिकच….आपण कधी कधी स्वतःलाच आठवत असतो… मी असा होतो..तसा होतो… आपण स्वतःच्या गतकाळाची देखील कमी भरून काढू शकत नाही मग जीवनात येऊन गेलेल्या व्यक्तींची कशी काढणार???

अगदी सोपं सत्य सापडलं आज…

बघा तुमाला पटतय का?..


आज एका मित्राचा फोन आला, तो मराठी नाही आहे पण शिवाजी महाराज हे त्याचे हीरो आहेत. सह्याद्री आणि इथली माणस यांच्याप्रती खुप प्रेम आहे त्याच.

तो म्हणाला महाराष्ट्राला एवढा मोठा आणि गौरवशाली इतिहास लाभला आहे, पण आजही मराठी माणूस कुठेतरी कमी पड़त आहे, आपल काय यापेक्ष्या माझ काय हे त्याला महत्वाचे आहे. असे का होतय ?

उत्तर देन कठीन होत, एकच त्याला गोष्ठ सांगितली,

मराठ्यांना लागलेला हा खुप जूना शाप आहे त्याला खुद्द शिवाजी महाराज चुकले नाहीत आमची काय औकात.

असो,

मराठीभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!!


🌔🌔 सुंदर विचार

अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर किंवा गोष्टींसाठी एकत्र येऊ शकतील…

पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जिवंत बेडकांचं तराजुत वजन करण्यासारखं आहे…दुसर्‍याला तराजुत टाकेपर्यन्त पहिला उडी मारुन पळुन जातो…

कारण यातील प्रत्येक पहिला स्वतःला दुसर्‍या पेक्षा सर्व बाबतीत श्रेष्ठ समजत असतो…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर….

आजच्या इतिहासकार लोकांची हीच गत आहे बघा, 10000% सत्य सुविचार आहे हा ..


 

MA ची परीक्षा सुरु आहे म्हणुन घरी आलोय, दोन पेपर झाले, अभ्यास करायचा आणि पेपरला जायच,

माझी आई आपली साधी सरळ पल्याडल्या जगात काय काय चाललय याची काही कल्पना नाही,

मला आज विचारती, एवढं पेपर झाल की तुला इथच सांगलीत नुकरी लागणार का ? बर हुईल बाबा इथच नुकरी लागली तर, काय हाय त्या पुण्यात… माझा नातू पण इकड़च शाळेत जाईल …

10307412_10153723755345295_3311121788237069327_n

परीक्षा झाली की लगेच नोकरी लागणार बास बाकीचे काय माहीत नाही.

आई लोक म्हणजे लय भारी माणस, साधी, सरळ, निरागस आणि निस्वार्थी व्यक्तिमहत्व.

पोरान जवळच रहाव ही तीची नेहमी भावना असते


 

विचार केला तर एक गोष्ठ नक्की, मानवी स्वभावामध्ये फारसा बदल होत नसतो मानसपुत्रांच्या स्वरुपात तीच घाण पुढे सरकते म्हणुन भविष्यकाळातील अंदाज बांधनी करण्यासाठी भूतकाळातील माहितीचा उपयोग पडतो.

भुतकाळ जळत्या निखाऱ्यासारखा सोबत ठेवून, वर्तमानकाळाच्या परिस्थितीचा अचूक अंदाज घेवून, भविष्यकाळाकड़े कूच करने हे आम्हाला छत्रपतींनी शिकवले.

हीच शिकवण पदरेला बांधून येणाऱ्या वर्ष्याचे स्वागत करावे, आणि तुम्हा सर्वाना येणारे वर्ष निरोगी आणि समाधानकारक जावे हीच इच्छा !!!


आज वर्षाचे शेवटचे दोन दिवस राहिलेत.

खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल……

धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल.

असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.

चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा.

अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे “राहो”.

💐 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

🚩🚩 जय शाहू … जय राऊ 🚩🚩


“बाजी” म्हणजे पराक्रम, बाजीरावांनी ऐसा पराक्रम केला की छत्रपती शाहू महाराजांचा दरारा व् दबदबा दिल्लीपर्यंत झाला.

बाजीराव-मस्तानी एक प्रेमकथा आहे, जी त्यांच्या पराक्रमाशी जोड़ता कामा नये. मस्तानी बाईसाहेब यांना बाजीरावांनी रखेल म्हणुन ठेवावे ऐसा आग्रह चिमाजीचा होता, पण बाजीरावांनी तिला पत्नीपद देवून स्त्रीत्वाचा सन्मान केला.

मस्तानी बाईसाहेब प्रणव पंथाच्या होत्या त्याकारणी त्या शाकाहारी होत्या. त्या बुंदेलखंडाच्या राजकन्या होत्या, परंतु बाजीरावांशी लग्न झाल्यावर क्षुद्र मनाच्या कुटुंबियांनी म्हणजे आई राधाबाई, बंधू चिमाजी आणि नादान पुत्र नाना यांनी तिला अखेरपर्यंत छळले.
विख्यात इतिहासकार रियासतकार यांनी म्हणले आहे, मस्तानी बाईसाहेब यांनी कोणाचेही मन दुखावले नाही, त्यांनी यथावकाश मराठी भाषा शिकली व मराठी पद्धतीचा पेहराव करीत असत.


चुकीचे असे काही नसते,
चुकीची असती ती लहानपनापासून असलेली आपली समजूत.


“संपूर्ण भारत” ही जी काही संकल्पना चाणक्यांची होती, त्याची सुरवात झाली ती “पाटलीपुत्र” मध्ये आणि संपली ती “मराठी प्रदेशामध्ये”.

अर्थात, पूर्ण भारत एका छत्राखाली आणून एक संपन्न राज्य निर्माण व्हावे याची जान असणारे दोनच सम्राट.

चंद्रगुप्त मौर्य आणि शिवाजी महाराज.


इतिहासावर प्रश्न उठवन्याआधी,
स्वताच्या आभ्यासावर प्रश्न उठवावेत.


जे काही चेन्नईमध्ये झाले आणि होत आहे ते वाईटच आहे पण एका गोष्टीचा विचार आपण करुयात,

पृथ्वीचे वय 460 कोटी वर्षे इतके आहे, हिशेबासाठी आपण 46 वर्षे धरुयात कारण गेल्या 50-100 वर्ष्यातच मानवी जीवनाची जास्त क्रांती झाली.

46 च्या हिशोबाने माणूस पृथ्वीवर येवून 4 तास झालाय, औद्योगिक क्रांती होवून 1 मिनिट झाला आणि या एका मिनिटांत आपन 50% जंगतोड केली.

प्रश्नपण आपलेच आणि उत्तरही आपल्याकड़च आहेत.


कार्यक्रमाची खरी पावती:

प्रशांत … बेटे तुम लोगोंको देखकर और हे प्रतिभाशाली समारंभ देखकर हमें बहुत सुख प्राप्ती हुवी, जितने भी कार्यकर्ता लोग जो इस समारंभ के आयोजक हे उनको मैं जिंदगी भर भुला नहीं पाउंगा, दिल कर रहा हे आपके साथ पुणे में ही रहूँ लेकिन अब ये देखकर मेरी जिम्मेदारी बढ गयी हे, मांडे सरजी जैसे गुरु तुम सभी को मिले शायद यही शिवाजी महाराज का आशीर्वाद है।

और आपका उत्साह और प्रसन्ता देखकर ऐसा लगा की शिवाजी यहीं कही आजु बाजू हे जो आप सबको देख रहे हे ।

— योगेंद्रसिंह जी

12316301_10153660875215295_3312447781111066333_n

जाता जाता या माणसान डोळ्यात पाणी आणल.

खुप भला माणूस हो.


 

शेजारच्या घरातल्या पुरगीवर कोणी नजर टाकली की म्हणायच पुरगीबी तस्लीच आसल …पोराचा काय दोष …

स्वताच्या पुरीवर कुणी नजर टाकली की मग स्वाभिमान जागा होतो, आणि मग विचारांची भाषा करायची …

शोभतय का ओ … आभ्यस्करते ना तुम्ही …मग ?


एक समजत नाही, इतिहासातल्या चुका काढ़ने, ऐतिहासिक व्यकतींच्या चूका काढ़ने किंवा कोण किती शाना आणी कोण किती मुर्ख यावर मोठ मोठे लेख लिहिने आणि चर्च्या करने यातून वर्तमानकाळात काय आणि कोणती देशाची प्रगती होणार आहे?

भुतकाळातली शेनकुट पेटवन्यापेक्ष्या वर्तमानकाळात काय दिवे लावताय हे बोला ना?

त्यो असा होता, हयो असा होता … आर बास की,

आता तुझ लगीन लावून दिलय की होवून दाखव ना बाप? उगच भुतकाळातल्या उचापती कशाला सांगताय ?


इतिहासाच्या अभ्यास जरूर करावा, पण स्वताची लाल करण्याचा मनसूबा नसावा, कारण यात इतिहासाची काळी होते.

आणि हो, इतिहासाला जात नसते.


दसरा संपला की, म्हातारीची गडबड सुरु व्हायची, घरात नुसता चकल्या, चिवडा, कळ्याच लाडू, कानुल, शंकरपाळ्या, शेव हेच असायचं, गल्लीत सगळी गाबडी किल्ला बनवण्यात बिझी असायची … तासातासाला घरात जायाच आणि एक चकली खायची आणि परत किल्ल्याकड … आई पाटीत एक दणका देवून म्हणायची

“एकदाच बसून खा की” …

पप्पा कामावरन घरात यायच्या आगोदर हात-पाय धून पुस्तक हातात घेवून बसायचं … आणि आयला बारीक त्वांड करून सांगून ठेवलेले असायचे

“पप्पाना सांगू नको आज दिवसभर किल्ला बनवत होतो म्हणून”.

म्हातारीला सारख सांगायचं, आय पप्पाला सांग की “हम आपके हे कौन” मधला सलमान सारखा ड्रेस घ्यायला …. कापड आणायला गेल की दुकानात त्वांड फुगवून बसायचो, आपल्याला जे पायजे ते महाग असायचं म्हणून म्हातार दुसर काहीतर घे म्हणून शिव्या द्यायचं … मग आईकड जावून वशीला लावायचा आईबी आपल एकदा म्हण्याची घ्या की पोरग मागतय तर … म्हातार म्हणायचं आग किंमत जास्त आहे …. पुढच्या दिवाळीला घेवू ….

दिवाळी दिवशी आई मस्त अंगाला तेल लावून, उटन्यान घासून आंघोळ घालायची, मग त्या पिशवीतन नवीन कापड काढायची, बारीक हसू तोंडावर ठेवून नवीन कापड घालायची, वासाच त्याल डोक्याला लावून, हूनवटी धरून कडन भांग पाडायची, पोन्ड्स ची पावडर तोंडाला लावायची आणि गोड गालाची पप्पी घेवून … चल तुला ववाळते म्हणायची …. ववाळून झाल की, चकली-चिवडा खायला द्यायची … मग खाऊन झाल की फटाकड्या उडवायला गल्लीत पळायच …. हे सगळ डोळ्यात एक वेगळाच सुख घेवून म्हातार बघत बसायचं … भायीर जाताना म्हातार मोठ्या आवाजात

“लय जवळ जावू नको, नीट फटाकड्या उडव” … असा दम द्यायचं.

आज हे सगळ आठवतंय, आणि वाटतंय कुठ हरवून बसलो मी हे सगळ, आईची माया आन बापाची धाक आज पुन्हा हवीहवीशी झाली आहे … पूर्ण लहानपण भावांबरोबर हसत खेळत गेल पण आज महिना महिना त्यांच्याशी बोलन होत नाही ….जग जवळ आल पण हे सगळ कुठ गेल कुणास ठावूक … शिक्षण करून मोठा झालो, पैसे कमवले पण म्हातार-म्हातारी कुठतरी लांब जावून बसली. हजार लोक बाजूला आहेत पण भाऊ कुठतरी या गर्दीत हरवून गेली …


 

डिस्कवरी वर बघत होतो .. सिहाची पिल्ल मोठी होतात याच दरम्यान त्यांना शिकार कशी करावी याचे प्रशिक्षण त्यांची आई त्यांना देत असते, पण कधी कधी शेवटचा यलगार हा गळा जबड्यात दाबुनच केला जातो हे शिकवल जात नाही कारण हा गुण रक्तातूनच येतो.

तरीही तुम्ही म्हणता राव, सिहाचा गुरु लांडगाच.


योग्य वेळी योग्य माणस मिळण ही परमेश्वराची कृपा,

पण योग्य वेळी योग्य माणस मिळवन,
त्या योग्य माणसांना योग्य हुद्यावर नेमन,
त्यांच्याकडून योग्य कार्य करवुन घेण,
आणि त्याचा योग्य मोबदला देन,
हे “व्यवस्थापन”.


जर तुम्ही चांगले ट्रेकर असाल तर नवीन लोकांना मदत करा, मार्गदर्शन करा, एखाद्या ट्रेक मध्ये मध्येच काही अड़चन आली तर पुढाकार घेवून सर्वाना त्यातून बाहेर काढ़ा.

असे असेल तरच स्वताला ट्रेकर म्हणा, नाहीतर गप कुत्र्यासारख घरात बसा नाहीतर एकटे जावा.

जर तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल तर नविन फोटोग्राफर लोकांना बारकावे सांगा, टेक्निक्स शिकवा, त्यांच्या चांगल्या फोटोना लाइक करुण कमेंट करुण त्यांना प्रोत्साहित करा.

उगच इथे स्वताची लाल करण्यात वेळ घालवु नका, इथे प्रत्येकाची लायकी सगळ्यांना माहीत आहे.
मी हवेत बाण मारत आहे, हवेत उडून ते बाण स्वताच्या ढुंगनात घेवून मला का बाण मारला म्हणुन कृपया वाद घालू नका.


 

नेपोलीयन म्हणतो :

तुम्ही जर एकाच शत्रूशी पुन्हा पुन्हा युद्ध केला तर तुम्ही तुमचे युद्ध कौशल्य त्याला शिकवता आणि त्याचे तुम्ही, यावरून तुमचे युद्ध वर्ष्यानुवर्षे चालणार जे कधी निर्णायक होणार नाही.

तसेच नवरा-बायकोचे असते बघा, एकमेकाना चांगले जाणून असतात, त्यामुळे त्यांचा अनिर्णायक लढा आयुष्भर चालू राहतो.


प्रत्येक गोष्टीकड़े तुलनात्मक दृष्टिकोन असणे हे शहाणपण नसून आडानचोटपणाचे लक्षण आहे.


1627 ते 1658 हा कार्यकाळ शाहजहाँचा म्हणजे 31 वर्ष्याचा …

ताजमहल बनवायला जवळ जवळ 25 वर्षे लागली … आणि तो मरायच्या आधी ताजमहल तयार होता म्हणजे अंदाजे 5 वर्षे आधी म्हणजे 31 मधून 5 गेले 26 राहिले …

म्हणजे गादीवर आल्या आल्या काम सुरु केले का ?? नॉनसेन्स गावठी.


तक्रारीचा निनाद असणे योग्य, पण ठनाना नसावा.
आपण शहाणे असणे म्हणजे दूसरे मुर्ख ऎसे नाही.


एकीकड़ अफझल दारावर उभा … दूसरीकड जिच्यावर जीवापार प्रेम असलेली अर्धांगिनी मृत्युच्या वाटेवर होती … काळीज रडतय पण डोळ भिजवून चालत नाय … काय कराव त्या राजान .. म्हणल नव्ह …

“राजान रडाव आंगुळी करताना मंजी डोळ्यातल पाणी आणि आंगुळीच पाणी यात दुःख झाकून जाईल”

प्रसंग आठवून बघा ओ …


सकाळी पेपर उघडला … शक्यतो पूरवनी वाचत असतो .. पण म्हणल आज पूर्ण पेपर वाचु .. बातम्या खरच विचार करायला लावणाऱ्या होत्या ..

कामगार कायद्यातील व्यापक बदलांच्या विरोधात एकीकडे देशव्यापी बंध … दुसरीकडे 22 वर्षयांनी श्रीलंकेत कसोटी मलिका जिंकन्याचा जल्लोष …

एकीकडे पिण्यासाठी पाणी नाही म्हणुन आत्महत्या तर दुसरीकडे कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वार्यावर सोडणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा वचननामा …

तिकडे ईशान्य भारतात अंतर्गत वाद एवढा वाढलाय की लोक मिलिट्रीला दगड फेकून मारू लागली तर दुसरीकडे लष्करप्रमुख दलबिरसिंग म्हणतात की छोट्या छोट्या युद्धाना तयार रहा.

एकीकडे औरंगाबादला संभाजीनगर करा ही बातमी जोर धरून आहे तर दुसरीकडे नारायनगाव आणि कोंडवा इथे स्फोट.

खरच माझा भारत किती विविधतेने नटला आहे ना !!!


जोवर मराठे हातात पेन घेणार नाहीत,
तोवर त्यांचा इतिहास नाही तर त्यांचा इतिहास लिहिणारेच चमकतील.


कस असतय बघा तुमीच ..
एक गृहस्त, नाव आणि आड़नाव सांगण्यात काही अर्थ नाही, ते म्हणाले शिवाजी-बिवाजी हे सगळ जून झाल रे त्याचा आता काय उपयोग नाही, जग बदललय, तुमी लोक उगच वेळ आणि पैसा वाया घालवताय, यातून काय तुमची प्रगती होणार नाही.

म्हणल ठीक आहे, या बदलेल्या जगात आजच्या शैलीन तुम्ही काय उपटली तेवढ़ सांगा मग मी सांगतो शिवाजी-बिवाजी यामूळ आम्ही काय काय उपटली ते सांगतो.

मग दोघ बसून ठरवू कुणी किती उपटली.


क्रांती या शब्दाचा अर्थ मी बदल असा घेतो, त्या काळात जो बदल या देश्यात घडून येणे आवश्यक होते त्यासाठी भरपूर तरुण क्रांतिकारांनी आपली वैचारिक दिशा बदलून एका उज्वल भविष्यासाठी समाजात वैचारिक बदल होने गरजेचे आहे हे जानले आणि तसे प्रयत्न केले आणि हेच बदल आपणास स्वतंत्र मिळवून देतील आणि आपला देश एक विशिष्ठ पातळी गाठेल आणि पूर्ण समाज एकत्र राहून सर्व बाजूनी प्रगतशील बनन्याचा प्रयत्न करेल याचा त्यांना विश्वास होता आणि आजही आपल्या देश्यात अश्या विचारांची गरज आहे त्यासाठी तरुणांनी योग्य दिशा पकड़ने गरजेचे आहे म्हणुन आजच्या तरुणांनी कालच्या तरुणांचा आदर्श ठेवून स्वताची आणि रास्ट्राची प्रगति कशी करावी हे शिकले पाहिजे आणि त्यासाठी इतिहासाची पाने चाळलीच पाहिजेत.


इतिहासाचा विद्यार्थी म्हणुन एक बात …

“इतिहासच्या वाटेवर चालत असताना, भूगोलाला वाट विचारायच विसरु नका, कदाचित चुकीच्या वाटनी जाल”


गोळी दोन डोळ्यांच्या मध्ये मारल्याने आपला दुश्मन लगेच मरतो, यात मज्या नाय,

गोळी कानाच्या जवळून मारा म्हणजे रोज सकाळी उठल्यावर त्याला पहिली आठवण आपली होईल.


एक लक्षात ठेवा मराठ्यांनो शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय नाहीत,

जातीयवादाचा विषय नाहीत,
कि भाषा आणि प्रांतवादाचाही विषय नाहीत,

शिवाजीमहाराज हे अखिल मानवजातीच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहेत.
त्यांच्या नावावर वेगवेगळे वाद निर्माण करून एका मर्यादित पक्षात , जाती – धर्मात बंदिस्त करू नका. त्यांचे व्यक्तीमत्व खुजं करू नका.
शिवराय नावाचा झेंडा जगाच्या क्षितीजावर डौलाने फ़डकू द्या तरच मराठ्यांच्या जगण्याला अर्थ आहे

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare