557859_10151890489370295_1486808507_n

नक्की परमेश्वराच्या मनात काय ?

नक्की परमेश्वराच्या मनात काय

557859_10151890489370295_1486808507_n

बरेच लोक म्हणतात कि आजकाल काहीही होतंय … कलयुग आहे …. कसला भरोसा नाही … वगैरे..वगैरे…. याला जबाबदार कोण ???? ….. कधी वाटत आपणच … कधी वाटत नाही ? जसे विज्ञान म्हणते “देवावर नाही तर विज्ञानाच्या शक्तीवर हे सगळे चालू आहे ” आणि कोण म्हणते “देवाचीच हि सगळी करणी आहे, तो जे करेल ते खरे आहे आणि सत्य आहे” …

पण सगळेच खरे आणि सत्य आहे का ? देव जे करेल ते खरच बरोबर आहे का ?? कित्येक वेळा चुकीच्या गोष्टी होतात …. मग ह्या का होतात ? असो … असेच मनात आले … म्हणून लिहितोय …

एका गावात एक महादेवाचे मंदिर असते जिथे एक मोठे शिवलिंग असते , आणि त्या मंदिरात एक पुजारी असतो ज्याच्या बऱ्याच पिढ्या त्या मंदिराची देखरेख आणि महादेवाची भक़्ति याच कामात गेल्या. आजच्या युगातला एक पुजारी असतो तो हि तेच करत असतो जे त्याच्या पूर्वजांनी केले.

अशीच भक्ती करत करत तो हि २०१५ मध्ये मरतो ….

एके दिवसी मंदिरात कोणी नाही बघून एक चोर शिरतो … शिवलिंगावर जे पाणी पडत असते (प्रत्येक शिव लिंगावर एक मोठे भांडे एका साखळीने बांधलेले असते ) ते पाण्याचे भांडे आणि साखळी सोन्याची असते … ती त्याला चोरायची असते , पण त्यःच्या हाताला ती येत नसते … मग तो काय करतो , त्या शिवलिंगावर चढून साखळी खोलतो आणि भांडे खाली घेतो आणि साखळीही घेतो तो पर्यंत देवाधीदेव महादेव प्रकट होतात आणि खुश होऊन त्याला प्रकट होतात आणि म्हणतात

“आज पर्यंत कोणी मला देह अर्पण केले नव्हते जे तू केले (तो पाय ठेऊन वरती चढला ना ). आणि त्याला वरदान देऊन टाकतात.

काय लीला आहे ….म्हणजे त्या पुज्यार्याच्या ३-४ पिढ्यांनी सेवा केली … आयुष्य पूर्ण परमेश्वराच्या चरणी घालवले … ते असेच गेले त्यांना कधी महादेव प्रकट झाला नाही … पण त्या चोराला प्रकट झाला ….

म्हणजे … मी जे म्हणतो “Your manager sees output, But intention is only seen by God” हे हि चुकलेच की इथे ?

आज काल जर पहिले, तर हा करता धरता ज्याला आपण “देव” म्हणतो तो अवेळी काहीही करतो ..
अवेळी पाउस पाडून शेतकऱ्यांचे नुकसान करतो आणि त्याच नुकसानाला भरपाई म्हणून नेते पैसे काढतात जे कधीच त्या शेतकऱ्याला मिळत नाहीत, शेतकरी मात्र बिचारा आत्महत्या करून मारतो !!!

मग परेम्श्वर नेमका कोणाच्या पाठीमागे आहे ?

एक वर्ष्यापुर्वी घडलेली घटना आमचा जवळचा मित्र “इंद्रजीत” डॉक्टर च्या निष्काळजीपणामुळे गेला !!!

याला जबाबदार कोण ??? याला न्याय देणार कोण ? शाषन ?? जे सर्व श्रीमंताच्या हातात आहे !!! म्हणजे परमेश्वराला आमची काही चिंताच नाही का ?

नेमके काय ??? नक्की न्याय व्यवस्था आम्ही कोणाची स्वीकारायची ? आणि ज्याची स्वीकारेल तो न्याय देईलच कशावरून ? मग तो देव असो व माणूस. का नाही त्या परमेश्वराने इंद्रजीतच्या मुला-बाळाचा विचार नाही केला ??? का नाही त्याने त्या म्हातार्या आईचा विचार केला ? त्या आईने अजून काय बघायचे ?? तिने न्याय कोणाला मागायचा ?? आणि तो मिळेल का ???

विचार आणि तत्वांची इथे मारामारी होत आहे !!!!

आम्ही नेहमी या श्रीमंताच्या गांडीखाली दबून मारायचे ??? … ठीक आहे मारतो आम्ही ?? मग आमच्या मुला बाळांचा विचार हा देव करणार आहे का ? ही खंदक कधी निघून जाणार ??

लोक म्हणतात “तो वरती बसला आहे न… तो सगळ ठीक करेल”

अरे कोणी मला सांगा “ठीक” ची व्याख्या काय आहे ?? आणि कोणत्या आधारावर मी त्या वरती बसलेल्यावर विश्वास ठेऊ ?

लोक म्हणतात आपणच हे बदलू शकतो … हो बरोबर आहे बदलू शकतो !! चला आम्ही तयार आहे.
पण ज्यांना हे बदलायची इच्छा नाही ते आम्हाला मारून टाकतील कारण सत्ता आणि मालमत्ता याच्यावर हे सगळे चालू आहे , मरायला पण तयार आहे …. आमच्या माघे आहेत त्यांचे काय ???

परत तेच ???? काय झाले डॉक्टर दाभोळकरांचे ??? कशासाठी त्यांनी धरला होता हा आठ्ठहास ??? काय करतोय हा देव ?? आणि का ?

आता काही अतिहुशार म्हणतात

“समस्यांच्या गुंत्यात अडकण्यापेक्ष्या, ते सोडवण्यात वेळ घालवावा”

हसू येते कधी कधी ………

असो माझ्या मोठ्या भावासारखा माझा मित्र इंद्रजीत गेला हेच एक सत्य आहे.जे विश्या पेक्ष्याही कडवे आहे.तो काय होता , कसा होता …. हे आम्हालाच माहित.

म्हणूनच हा प्रश्न पडला “नक्की परमेश्वराच्या मनात काय ??”

-प्र.ब.ल.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

1 comment on “नक्की परमेश्वराच्या मनात काय ?Add yours →

  1. जात पात धर्म या सर्व गोष्टी मानवाने आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे.
    बाकी तुमचा हा लेखन प्रपंच पाहुन असं वाटलं कि चला कुणाचंतरी लक्ष आहे बुवा ह्याही विषयावर.
    आज समानतेच्या नावावर सगळी मंडळी आंबेडकरांच्या नाववर ठणठणाट करत जरी असली तरी जातपात हा मुद्दा कुणी आज मानत नाही हा आमचा सर्वात मोठा गोड गैरसमज आहे.
    वेळ हरेकावर येतेच त्या वेळी समजतं की जात वगैरे काहीही नष्ट झालेलं नाही ते आहे तसंच आहे.
    उचल्या,उपरा,फकिरा, कोल्हाट्याचं पोरं ही लेखन साहीत्ये जातपात नष्ट झाली आहे असं समजणार्यांनी जरुर वाचावित म्हणजे जळजळीत वास्तव कळेल त्यांना.
    चारचौघं करीयर साठी धडपड करणारी एकत्र आली की आधी चौकश्या होतात, “कारे ? तु कास्टमधला का ? तुम्हाला बुवा बरं आहे भरपुर आरक्षण आहे जिथेतीथे.”
    पण तोच विचारणारा आरक्षण का आहे ? याचा मात्र ढुंकुनही विचार करंत नाही.
    आणि जातीमुळं वैयक्तीक रित्या मी सुद्धा बर्यावाईट हरेक गोष्टींचा अनुभव घेतलाय आणि घेतंच आयुष्य पुढं सरकतं आहे…
    बाकी जातपात असलं काही नसतं हा विचार फक्त लव्ह मॅरेज करत्या वेळीच केला जातो ही गोष्ट मात्र एकदम पटली.
    आपली लेखनकला अशीच बहरंत जावो ही सदिच्छा.
    !! जय जिजाऊ !!

Leave a Reply to विशाल गवळी Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *