B821673306Z.1_20140725163708_000_GMF19P759.3_Content

प्रगती फ़क़्त कागदावर …

प्रगती फ़क़्त कागदावर …

time_manage_c

फोटो आभार : इंटरनेट 

गेली १० वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करतोय, जसा जसा अनुभव वाढत गेला, तसे मुलाखतीला गेलो की मुलाखत घेण्याची पद्धत (फ़क़्त प्रश्नांची पातळी) ही बदलत गेली.

मध्येच शिवरायांना मी वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो होतो, शिवरायांचा आभ्यास करताना नेहमी एक प्रश्न नक्कीच पडतो जो त्यावेळी औरंगजेब बादशहा आणि बाकीचे सुलतान यांना ही पडत होता, ज्याचे उत्तर आजही ठामपणे सांगता येत नाही पण एक कल्पना करून एका पातळीवर आपण एक समजूत नक्कीच काढू शकतो,

तो प्रश्न म्हणजे

“हा माणूस हे सगळ करतो कसे ? ”

वर्तमान भाषेत बोलायचे म्हणले तर “कस केल आसल हो महाराजांनी हे सगळ ?” …

बरेच तर्क-वितर्क लावून, अलंकारिक शब्दांचे गोंधळ घालून काही तताकथित इतिहासकारांनी शिवरायाना अगदी देवच बनवून टाकल, शिवरायांचा मालकी हक्क घेतलेले इतिहासकार तर सरळ म्हणतात ..

“शिवाजी ….. शिवाजी एक गूढ आहे हो … जे १०० जन्म घेतले तरी उलघढनार नाही” आणि त्याला साथ म्हणजे “आई-भवानी प्रसन्न होती”.

कधीही कुणी शिवरायांचा विश्लेश्नात्मक आभ्यास करून शिवराय ही एक हाडा-मासाचे असामान्य गुण असलेले एक सामान्य व्यक्ती होते हे कोणच सांगत नाही. त्यांचही बरोबरच आहे म्हणा … लोकांना जे ऐकायला-वाचायला आवडते तेच लिहावे.

असो …

क्षेत्र कोणतेही असो “व्यस्थापन” या एका शब्दवर सारा प्रपंच चालतो. मग शिवरायांच्या बाबतीतही हेच आहे.

“अचूक नियोजन आणि अचूक अंमलबजावणी”“Perfect planning and Right Execution”. हे आपोआप होत नाही बर का ..

एक योग्य व्यास्थापक होण्यासाठी बर्याच परिश्रमातून, अभ्यासातून आणि विशेष म्हणजे योग्य संस्कारातून जावे लागते. ज्या व्यक्तीचे संगोपन एका परिपूर्ण संस्कारामध्ये झाले आहे त्या व्यक्तीला कोणा विशेष गुरूची आणि शिकवणीची गरज अजिबात लागत नाही, हे शिवचरित्र आपल्याला ओरडून ओरडून सांगते, पण आम्हाला या गोष्टी ऐकू येत नाहीत कारण झोपून इतिहासाची पुस्तक वाचण्याची सवय आमची काय जात नाही.

“Perfect planning and Right Execution” या एका वाक्यात शिवरायांनी पूर्ण व्यवस्थापन सांगितले आहे. हाच मुद्दा घेवून मी काही दिवसांपूर्वी माझेच एक संगणक क्षेत्रातील एक अनुभवी मित्र आहे त्यांच्याशी चर्चात्मक वाद घालत होतो.

जेव्हा जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तुम्हाला एक प्रश नक्की विचारला जातो,

“Tell me any one critical situation which came in your project and you handled it”

प्रश्न जुनाच जो गेली कित्येक वर्षे विचारला जातो, यावर मी उत्तर दिले,

Why don’t you plan your project in such a way that critical situation will not occur, and if it comes in between, why you never thought of this before it knocks your door?”

गाफील रहाणे, यालाच म्हणतात.

जर तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या मोहिमेवर नसेल तर असेच होणार, सिद्धी जोहरचे उदाहरण घ्या, एका रात्रीत हातावर तुरी ठेवून शिवराय निसटलेच ना, त्यानंतर लगेच शहिस्थेखानाचे उदाहरण घ्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात पहारा असून सुद्धा मराठे लाल-महालात घुसले आणि वाट लावली. शिवरायांच्या बाबतीत असे काही दाखवा … का नाही घडले असे ?

एखादी critical situation आल्यावर त्यावर आदळ-आपट करून पूर्ण लोकाना रात्रभर बसवून काम करून घेणे यात कसली हुशारी ? आणि यात कोणते व्यास्थ्प्नाचे गुण झळकतात ?

पण दुर्दैव म्हणजे, असे काही तुमच्या बाबतीत घडले नाही तर तुम्ही मूर्ख, किवा तुमची मोहीम खूपच सोपी होती किवा तुमच्या संघात चांगले खेळाडू होते म्हणून सगळे सुरळीत पार पडले, याचा अर्थ तो जो व्यवस्थापक होता तो मूर्खच.

आजही संगणक क्षेत्रात असे प्रश्न विचारले जातात आणि जर तुम्ही वर सांगितल्यासारखे उत्तर दिले तर तुमची तुलना खालच्या पातळीवर, नक्की कसली क्रांती झाली हो संगणक क्षेत्रात, बर झाली … विचारांनी क्रांती कधी होणार. जे परंपरेने चालत आले आहे तेच योग्य, दुनयेची विचारधारा बदलली आहे ते आम्हला माहितच नाही आणि तसे बदल आम्हाला नको आहेत, कारण बदल म्हणले की थोडा त्रास आला जो आम्ही सोसू शकत नाही.

लहानपणी बघा आपण शाळेत प्रार्थनेला उभे रहायचो, असाच एक किस्सा सांगतो …

एका रांगेत सगळ्यात शेवटी उभारलेले पोर जरा चाबर असत, त्याच्या पुढे जे पोरग असते त्याची चड्डी फाटलेली असते, मग हे बेन फाटलेल्या ठिकाणी बोटान डिवचत, ते त्याच्या पुढच्याला डिवचत असे करत करत सर्वात पुढे उभारलेल्या पोराला पण डिवचले जाते, आता त्याच्या पुढे मास्तर असतो तो मास्तरच्या ढुंगनाला डिवचत, मास्तर माग वळून एक कानाखाली वाजवत, आणि विचारतो का डिवचले, ते पोरग म्हणत मला मागून डिवचले म्हणून मी पुढे डिवचले.

म्हणजे काय, चालत आलेली रीत मग ती चुकीची का असेना आम्ही पाळणार. मग कुठेतरी जावून मुस्काडात खावी लागणारच ना. ज्याला आजच्या भाषेत “Escalation” असे म्हणतात.

मग नक्की प्रगती कुठे आणि कधी होणार, ज्याला आपण विचारधारा म्हणतो ती कधी बदलणार, मग नक्की शिवचरीत्राकडून काय शिकायचे हा प्रश्न पुन्हा डोके वर काढत आहे. फुकट मिळालेले ज्ञान नको पण लाखो रुपये भरून MBA नक्की करणार आणि तेच शिकणार जे पुस्तकात काही लोकांनी लिहून ठेवले आहे जे वर्ष्यानुवर्ष्ये चालत आहे, परिस्थितीनुसार विचारधारा बदलावी हे आम्हाला नाही आवडत.

लक्ष्यात ठेवा, शिवचरित्र हे एक चालते बोलते व्यास्थ्प्नाचे पुस्तक आहे, ज्याला नेहमी दिमागात ठेवा.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

8 comments on “प्रगती फ़क़्त कागदावर …Add yours →

  1. सुंदर लेखन नेहमी प्रमाणे पाटील

  2. शिवचरित्र म्हणजे काटेकोर नियोजन आणि सर्वसमावेशक व्यवस्थापन…
    अनेक प्रसिद्ध लेखकांनी तर शिवरायांच्या व्यवस्थापनाचं उत्तम मार्केटिंगही केलंय…
    असो as always परंपरागत चाकोरबाहेरचं तुमचं लिखाण आहे आणि राहील अशी अपेक्षा..
    !! जय जिजाऊ !!

Leave a Reply to Poonam Pacharne Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *