DSC_0291

राजमाची

मुलभूत माहिती:

प्रकार – माध्यम पल्याची खडतर वाट

२००० फुट उंची 

ट्रेकचे अंतर : १३ किलोमीटर.

पुण्यापासून १३५ किलोमीटर 

मार्ग : पुणे – कर्जत – कोंदीवडे

आमचा ट्रेक दिवस : ०३ ऑगस्ट २०१३

Difficult Level : Medium to Low

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच ‘उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे.या बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.जसा नाणेघाट तसा बोरघाट,त्यामुळे या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे.या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.यापैकी सर्वात प्रमुख’ किल्ले राजमाची.किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड,विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच ‘कोडांणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवाटीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणाचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवजाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग,तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाकल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीने वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होनी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि बाजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळएका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भा महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड’ म्हणतात या कुंडात लोक मोठ्य श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते. पायथ्याला उधेवाडी गांव असून गावातील घरांमध्ये रहाण्याची सोय होते. गडावर थोडीशी तटबंदी बुरुज व इमारतींचे जमीनदोस्त अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वाटेवरुन जाताना एका बाजुला पावसाळ्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात घनदाट झाडी प्रचंड धबधबे, उसळणारे ढग, अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती हे दृश्य अतिशय सुंदर, रमणीय आनंददायी आहे.

नेहमीप्रमाणे लवटे-पाटील आणि सरदेसाई यांनी ट्रेक ची सुरवात केली.

कोंदीवडे गावातून हा ट्रेक सुरु होतो थोड्याच वेळाने तुम्हाला वन विभागाची पावती फाडावी लागेल प्रत्येकी १० रुपये, जिथून सरळ पुढे गेल्यावर कोंढाणे केव्स लागतात.

इथून पुढे जंगली वाट आहे , टीपीकल सह्याद्री. त्यापैकी काही फोटोस.

राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी Rajmachi Rural Aid and Development Programme या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कॅंपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे. याबाबत अधिक माहिती http://visitrajmachi.blogspot.com/ या ब्लॉगवर उपलब्ध आहे. गिरी भ्रमंतीची व दुर्ग भ्रमंतीची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ आहे. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठा दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे.पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे.या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ‘म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रध्देने सूर्यस्नान करतात.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

1 comment on “राजमाचीAdd yours →

Leave a Reply to Prem Balaram Suroshi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *