DSC_0030

किल्ले तोरणा

मुलभूत माहिती:

  1. प्रकार – खडतर
  2. ट्रेकचे अंतर : 10-12 किलोमीटर (४६०३ फुट)
  3. पुण्यापासून  ९० किलोमीटर 
  4. ट्रेकचा दिवस : १९ जुलै २०१४
  5. मार्ग : पुणे – नसरापूर फाटा (NH4)  वेल्हे गाव

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले.

२०१४ ची ट्रेकिंग ची मोहीम सुरु होत नव्हती … मनसुबा होता तो आमची बाजींची वारी मानला जाणारा पन्हाळा-विशालगड या ट्रेक पासून सुरवात करावी … पण पावसाने हुलकावणी लावल्यामुळे १२-१३ जुलै चा पन्हाळा-विशालगड ट्रेक आम्ही रद्द केला …. मग आमचे भांड्कोरे परममित्र “राकेश सरदेसाई” यांनी फोन करून सांगितले ….

“भावा … शनिवारी तोरणा …” काही प्लान असेल रद्द कर ….

झालं…. चल म्हणलं जाऊ … कोण-कोण आहे विचारल … कोनच  नाही … मी राकेश … कंगकण (हे एका मुलाचे नाव आहे :) ) आणी … “नेहमी ट्रेकला चल म्हणलं की नौटंकी करणारा आमचा दुसरा परममित्र “विवेक चव्हाण”…..

मग शनिवारी सकाळी मी विवेक च्या घरी गेलो… तिथून विवेक ची BMW (मारुती अल्टो) घेऊन आम्ही हायवे धरला … जाता-जाता राकेश भाऊ आणी कंगकण ला उचलले ….  आणी नीट तोरणा गाटायचे ठरवले… आधे मध्ये न थांबता आम्ही नसरापूर फाटा गाटला … तीथून उजवीकडे रस्ता जातो .. तो सरळ वेल्हे गावाकडे .. अंदाजे ३५ किलो मीटर … जाता जाता मस्त वातावरण होते म्हणलं थोडी फोटोग्राफी करावी .. म्हणून थोडा वेळ थांबून .. फुटू काढले …

फोटोग्राफी संपली … मग आम्ही तोरणा गडाच्या पायथ्याशी … वेल्हे गावात पोचलो … गावात एका घरापुढे गाडी लावली आणी बूट घातले .. आणी गड चढायला सुरवात केली … नेहमीप्रमाणे लवटे-पाटील आणी सरदेसाई यांनी सुरवात केली …. :)

सरळ सोपी वाट आहे. त्यामुळे वाट चुकण्याचा इथे प्रश्न येत नाही. वाटेत एक फलक तोरणा किल्ल्याविषयी माहिती दर्शवित होता.तो वाचत पुढे सरसावलो. पुढे एका वळणावर रहाट असलेली एक विहीर दिसली ,काही बायका माणस तिथे पाणी भरत असताना दिसले…तिथून पुढे पुलावरून जी वाट जाते ती आपल्याला थेट गडाच्या बिनी दरवाज्यापर्यंत नेते. सरळ सोपी वाट आहे. त्यामुळे इथे चुकण्याचा काही प्रश्न येत नाही… गाईड घेण्याची आजिबात गरज नाही ….

अतिशय थंड वातावरण … हलका पाऊस सुरु होता … नेहमीप्रमाणे १ लाख रुपये हातात घेऊन चालत होतो .. :) (कॅमेरा)… जाताना फोटो घेत घेत चालत होतो  … आमच्या मित्र मंडळींना प्रोफाइल फोटो कडून देण्याचे सांगितले होते … मस्त होते सर्व काही…. तोच अनुभव जो प्रत्येक ट्रेकर ज्याची वाट पाहत असतो…..

तेच ते सह्याद्रीच रांगडापणा…

ते किल्ल्यांच वैभव ..

ते सह्याद्रीच जंगल …

काय ते धबधबे …

व्हा …..

थोडे पुढे गेले की … एक सरळ वाट आहे जिथे दोन्ही बाजूला जंगल आणी दरी… या ठिकाणी असले जोरात वारे होते की चालताना सुद्धा माणूस बाजूला फेकला जाईल…. अतिशय जोरात वारे होते…. तिथे आम्ही बसून थोडा नाष्टा केला … पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल ची सहल आली होती … त्यांनी एक वेगळीच गर्दी केली होती ….दहावीची पोर-पोरी होती… वाटलं लहान पण तस काही नव्हत .. चांगली औलादी होती ….

तिते बसून मग मस्त फोटो काढले ….  नाष्टा केला (चिकन होते) …. :)

टेत पुढे काही अंतर पार केल्यावर काही पायर्या लागतात . त्या रेलिंग च्या सहाय्याने चढून आपण एक एक पाऊल पुढे टाकू लागतो. तोच समोर नयनरम्य धबधबा लागला. तिथे फोटो सेशन झाल्यावर आम्ही थोड्याच वेळेत बिनी दरवाज्यापर्यंत पोहोचलो. २ तास २०  मिनिटे इतका अवधी आम्हास लागला. बिनी दरवाज्यापर्यंत पोहोचण्यास. वेल्हे गावातून बिनी दरवाजा पार केल्यावर गोमुखी पद्धतीचा कोठी दरवाजा लागला. ..आणि गडाच्या अंगणात आमचा प्रवेश झाला. डाव्या हाता कडे वळून आम्ही एक एक वस्तू पाहत पाहत ”दारू कोठार” जवळ आलो. आणि तेथून मग बुरूजा जवळ. बुरुजावरून झुंजार माचीच सुंदर रूप आपल लक्ष वेधून घेत. राजगड च सुंदर मनोरम्य दर्शन सुद्धा येथूनच होत.

गडावर पोचताच एक नवीन बांधकाम दिसले … थोड्यावेळा साठी वाटले कदाचित पवार साहेबंचे विश्राम गृह असेल :)

मग आम्ही थोडावेळ गडावर फिरलो … अतिशय दाट धुके होते त्यामुळे काही पाहण्याजोगे नव्हते … झुंझार माचीच्या आगोद्त जे टोक आहे तिथे बसून थोडी मस्त हवा खाल्ली … विवेक ने थोडे फोटो काढले….

पावसाच्या जोरदार सरी, प्रचंड वेगाने सुसाट वाहणारी हवा नव्हे वादळ; स्वत:चा तोल कधिही जाउ शकतो; ह्या धडपडीत गडावरचं स्रूष्टी-सौंदर्य अनुभवयाची मजा काही औरच ! गडावर फिरत-फिरत आम्ही झुंजार माची दिसते त्या कडेला आलो. ति हिरवी गार माची अतिशय सुंदर दिसत होती. तिचा फोटॊ घ्यावा म्हणुन कॅमेरा काढला आणि धुक्यांचे पांघरुन घेवून तिने स्वत:ला झाकून घेतेले. आम्ही सर्व जण झुंजार माची परत स्पष्ट बघण्यासाठी थोडा वेळ माचीकडे एकटक बघत तिथेच थांबलॊ. निसर्गाचे ते अतिव सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करु लागलो. आता मात्र त्या ढगांचा हेवा मला वाटत नव्हता.

 

परत येताना … अगदी सांभाळून यावे लागले कारण … पावसाने जोर धरला होता … आणी पावला-पावला वर घसरगुंडी होणार याची खात्री होती … या घसरगुंडी वरून मी .. राकेश आणी विवेक वाचलो … पण बिचारा कंगकण ने गुडगे टेकले … अक्षरशः “पड” म्हणलं की पडायचा गडी :)

विवेक आणी राकेश तर मला म्हण्याचे की तू त्याचे मनोधैर्य ढासळवत आहेस … आता मी आपलं मजेत म्हण्याचो .. की “कंगकण  अपना Mind Set करले .. इधर गिरणा है” … असे मी म्हणलो आणी तो पडला :)…

अशी मस्ती करत करत आम्ही खाली उतरलो … खाली उतरलो आणी एक धबधबा होता जीते बूट धुतले … हात-पाय धुतले … आणी मग गाडीजवळ पोचलो…

गाडी जवळ पोहचून आम्ही कपडे बदलले … एक मस्त चहा मारला … आणी पुण्याची वाट धरली.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “किल्ले तोरणाAdd yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *