मुलभूत माहिती:
- पुण्यापासून १५० किलोमीटर
- ट्रेकचा दिवस : २८ सप्टेंबर २०१४

भूषण दादान प्ल्यान केला आणि वसंतगड, गुणवंतगड आणि दातेगड (सुंदरगड) असे तीन गड बघायचे ठरवले … भूषण दादा, शैल्या, आन्या आणि मी असे आम्ही ४ जन जाणार होतो … यावेळी आम्ही नवीन “फिगो” (ब्लूटूत वाली ) घेऊन जाणार होतो …
ठरल्याप्रमाणे सकाळी ५ वाजता दादाच्या घरी जमणार होतो पण … आम्ही ५-४५ ला पोहचलो .. 
मी आणि शैल्या पहिला पोहचलो मग आमचा आन्या आला …
अंदाजे ६ च्या दरम्यान आम्ही पुणे सोडले .. आणि कोल्हापूर हायवे ला लागलो, टोलनाका वलांडल्यावर आम्ही न्यारी करण्यासाठी थांबलो … माझा उपवास होता आणि दादा म्हणतो “जिम करणारा माणूस” कशाला काय लागतंय … पण मला जाम टेनशन आल होत … राजगीर्याचे लाडू खाऊन भर उनात गड चढायचे होते … तरीपण किडा होता, म्हणल बघू काय होतंय .. जाऊ …
वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला.मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला . याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.
इ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.
२ तासात आम्ही उंब्रज मार्गे तळबीडला पोचलो … बर्याच वेळा सांगलीला जाताना सारखा बोर्ड बघायचो “हंबीरराव मोहिते समाधीकडे”, मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते. पण कधी जाण्याचा योग नाही आला .. पण आज तो योग होता कारण वसंतगडाच्या पायथ्यालाच तळबीड गाव वसले आहे ..
जाताना आम्ही समाधी पहिली पण दर्शन घेत आले नाही म्हणले यातना दर्शन घेऊ …
गाडी लाऊन आम्ही गड चढायला सुरवात करणार तोपर्यंत एक बाजूला घर होते .. समोर एक म्हस बसली होती म्हणलं एक फोटो घ्यावा …
तोपर्यंत आन्या पण म्हणला माझा पण एक भावा…. फोटो काढून गड चढायला सुरवात केली …
गड चढत असताना २-३ थांबे झाले … मग थांबलो की फोटो काढायचे … असे करत आम्ही चालत होतो…
गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसर्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळि आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
श्री चंद्रसेन महाराजांचे मंदीर
मंदिरापुढे ३-४ मोठ्ठे दगड होते … असे म्हणतात की कोणतीही इच्छा मनात ठेवा आणि हे दगड खांद्यावर उचलून घ्या .. तुमची इच्छा पूर्ण होईल … आम्हीही दगड उचलले….
मंदिरापासून पुढे गेले की मोठ्ठे पठार लागते … अतिशय चांगल पठार लाभलेला हा गड … दोन मोठ्ठे तलाव आहेत … तलावापासून थोड्याच अंतरावर एक दिमाखात उभारलेले बुरुज दिसेल … पायऱ्या चढून तुम्ही वर जाऊ शकता … तिथे बसल्यावर आजूबाजूचा जवळ-जवळ ५-७ किलोमीटर चा भाग दिसेल असा हा गड आहे …
गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे.
गडाखाली उतरून आम्ही “सरसेनापती हंबीरराव मोहिते” यांच्या समाधीचे दर्शन घेतले … अतिशय दुंदर पद्धतीने समाधीची देखभाल केली आहे ...
गडावर फिरताना नक्कीच गडाची ताकत जाणवते … आजूनही गडाचे बुरुज चांगल्या स्थितीत आहेत .. गडावर मस्त गवत असते, बर्याच रंगांची छोटी-छोटी फुले असतात ….गडाची तटबंदी अजून हि तशीच दिसते ,गडावर फिरत असताना त्यावेळच गडाच वैभव काय असेल याची कप्लना नक्कीच करता येते आणि त्यावेळचे वैभव डोळ्यासमोर उभे राहते … अतिशय सुंदर असा गड … आम्ही सगळेच गडाच्या प्रेमात पडलो ..
गुणवंतगड
खाली आल्यावर आम्ही वेळ न घालवता “गुणवंतगडाकडे” निघालो … तळबीड हून .. पाटण … मोरगिरी … आणि मग गुणवंतगड … १८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स.१८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपण्यात … सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.
आम्ही गडाच्या खाली मंदिराजवळ गाडी लावली … तिथे जेवण केले .. जेवण झाल्यावर माझी जर परिस्थिती बेकार होती … उपवास आणि कडक उन यामुळे डोके फार दुकट होते … म्हणल मी थांबतो खालीच तुमी जाऊन या .. नाहीतर मी कोमातच गेलो असतो ….
गडावरती काहीच नाही पाहायला आमचे सहकारी जाऊन आले … १ का तासातच परत आले …. मग लगेच हात-पाय धुवून आम्ही “दातेगडासाठी” निघालो.
हा किल्ला बामणोली डोंगर रांगेत येतो .. सध्याची परिस्थिती हि नष्ट होण्याच्या मार्गावर आहे
दातेगड (सुंदरगड)
पाटण गावातून.. टोळवाडी .. तिथून चाळकेवाडी मार्गे तुम्ही अगदी गडाच्या पायथ्याला जाऊ शकता. अतिशय सोपा आहे हा गड .. १५ मिनिटात तुम्ही गडावर पोहचाल .. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
लांबून पहिला की असे वाटेल की एक मोठ्ठा दगडच आहे … अजिबात गड आहे असे वाटत नाही … नैसर्गिक तटबंदी लाभलेला हा गड … पण देखना गड ….
१० मिनिटे चालले की एक देखना बुरुज लागतो … दगडातून वर गेलो की मग आपण गडावर पोहचतो…. सुंदर छोटे पठार आहे … पिवळ्या फुलांची झाडे पाहिली की असे वाटते , पिवळा गालिचाचं अंथरला आहे ….
खडकात खोदलेली विहीर हेच एक बघण्यासारखे आहे .. अतिशय जबरदस्त अशी विहीर आहे … विहिरीच्या काठी उभारून खाली पहिले कि नक्कीच चक्कर येउन खाली पडाल अशी हि विहीर आहे …
दातेगडास शिवकालात सुंदरगड असेही नाव होते. शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे सौंदर्य बघून त्यास “सुंदरगड” असे नाव दिले होते … दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्वकालीन असावा असे वाटते. अतिशय सुंदर असा गड आहे … मी जेव्हा हा गड रस्त्यावरून पहिला त्यावेळी म्हणालो…
“महाराजांनी यात काय पहिले कि याला सुंदर गड असे नाव दिले … खद खडक तर दिसतो …
पण गडावर गेल्यावर मी CTL +Z केले …. अतिशय सुंदर किल्ला … लांबी जास्त लाभली नाही किल्यास .. पण सुंदर किल्ला …
शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देणअयात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्टर आहे. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.या बाजूस जाण्यासाठी पश्चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायऱ्या आहेत.
१९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात गडाचा महादरवाजा कोसळला. येथे शेजारीच सहा फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्ती शेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची श्री हनुमंताची मुर्ती आहे. हा सर्व परिसर पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने वर यायचं. थोडं पुढे गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. तिच्या पायऱ्यांनी खाली तळात गेल्यानंतर पाण्याच्या थोड अलीकडं डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे मंदीर लागते. या छोट्या मंदीरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. ही विहीर पाहून परत वर यायचं. गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात 8-10 फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.






























0 comments on “वसंतगड – गुणवंतगड – दातेगड (सुंदरगड)” Add yours →