DSC_0090

कोकनाची वारी : भाग – 2

सकाळचे १० वाजले होते, भरतगड ह्या देखण्या आणि सुंदर गडाला मुजरा करून, गडावरून पाय काढला, वेध लागले होते ते

शिवलंका … किल्ले सिंधुदुर्ग” चे ..

“स्वराज्याचा पाया हा सह्याद्रीचे भव्य किल्ले,आणि स्वराज्याला कळस म्हणजे जलदुर्ग”

 या जलदुर्गांची तारीफ करावी तेवढी कमीच, जमिनीवरच आभाळाला भेदणारे किल्ले हे सह्याद्रीत होतेच आणि नवीन ही बांधले होते, त्या महात्म्याची बुद्धी पाहून कदाचित इंद्रदेव ही कावरा-बावरा झाला असेल अशी कीर्ती माझ्या राजाची. या कीर्तीला जोड म्हणजे “जलदुर्गांची”, शिरपेचात जणू गरुडपंखच हो. माझ्या राजाची ही किमया पाहून एक इंग्रज अधिकारी ही बोलून गेला…

“डोंगर दर्यामधला राजा आता समुद्रात उतरत आहे, सावध रहावे”…

 सिंधुदुर्गचे किस्से आमच्या धाकल्या पाटलांच्या मधुर वाणीतून ऐकत आम्ही मालवण मध्ये पोहचलो, दुरूनच ती भव्य आणि अभेद अशी तटबंदी पाहून डोळ्यात एक वेगळेच तेज आले हो, छाती भरून आली होती,  कधी एकदा गडात पाय ठेवतोय असे झाले होते. गडाबरोबर सेल्फी काढण्याचा मोह कसा आवरेल …

 आम्हला गडावर ३-४ तास तरी थांबायचे होते, पण त्या बोट वाल्यांची एक वेगळीच बुद्धी, म्हणे १ तासात परत यायचे नाहीतर special बोट करून यावे लागेल, आणि त्याचे १००० रुपये होतील …  तडजोड करण्याचा प्रयत्न केला, शेवटी धाकले म्हणले पाटील एक बोलू का ? म्हणल बोला

“यांच्या आ*******”

पाटलांच्या भावना पोचल्या, मग म्हणल  भाऊ तू काय तुजा बाप पण येईल आम्हाला परत न्यायला …. पटापट तिकीट काढून … गफागफ बोटीत बसलो आणि डुलत डुलत बोट गडाकडे निघाली, सगळ्यांच्या नजरा गडाकडे लागल्या होत्या, तटबंदीची भव्यता जशी जवळ जाईल तसी डोळ्यात मावेनाशी झाली होती.

बोटीत बसून तटबंदीचे मनसोक्त फोटो काढले …. ” ते म्हणतात ना बघता क्षणी त्वांड बंदच …. सगळी अगदी थंडगार होवून तटबंदी पाहत होते …

लय  वाईट हो !!

किती ??  …. “लय”.

 जर भव्यता बघायचीच असेल तर तुमी धाकल्यांच्या डोळ्यात बघा ….

जसा पाय बोटीतून बाहेर ठेवला तसा जावून पहिला ती तटबंदी शिवली हो …

हात आणि माथा त्या तटबंदीवर जसा ठेवला तसा अंगावर सररर कण काटा आला …. आणि येवू पण का नये भाऊ !!

जसेच्या तसे नागमोडी वळण घालून महादरवाज्याकडे जायचा मार्ग, खर सांगायचे तर त्या महादरवाज्याचे वर्णन करणे फारच अवगड आहे, अतिशय भव्य आणि देखणा, शाब्याला म्हणल सगळी थांबव भाऊ आपल्याला फुटू काढायचा आहे, लगेच शाब्याने हात मागे सारत,
“ओ थांबा हो जरा, फोटो काढणे चालू आहे” …

दादागिरी नव्हती ही, आमचे नेहमीचे बोलणेच आहे हे …फ़क़्त लोकांना ते वेगळे वाटते :)

बिचारी माणस शाब्याला भिवून थांबली राव :). लगेच मग फटाफट फोटो काढले.

 

 जसे फोटो काढून झाले तसे आमचे गारदी (शाब्या) म्हणाले “पाटील गारद द्यायची आहे” …

म्हणल मग वाट  कुणाची बघतोय भाऊ, कर सुरु ….

काय गारद झाली, असे वाटले इतक्या वर्ष्यापासून झोपलेले तटबंदीचे दगड डोळे चोळत चोळत उठले असतील, आणि म्हणले असतील ..

“आर उठा उठा …. आपल राज आल्यात मुजरा घाला आपल्या धन्याला”. 

सगळी माणस डोळ्यात एक वेगळेच आश्चर्य ठेवून बघत होते, बाहेर जाणारी माणस आतच थांबली होती. पूर्ण गारद झाल्यावर मगच सगळ्यांनी पाय हलवला. कदाचित एवढ्या वर्ष्यानंतर प्रथमच या किल्ल्याने आपल्या धान्याचा गौरव ऐकला असेल.

_________________________________________________________________________________

 गारद झाली … गडामध्ये शिरलो …. आजूबाजूला बाजार मांडला होता … चढ्या घालून आलेले चिमणी-पाखर टोप्या आणि बाकीच्या गोष्टी घेण्यामध्ये रमले होते, कोणी थंड सरबत पीत होते तर कोणी उन्हाला शिव्या घालत पाय टाकत होते. पुढे गेलो तर “महाराजांचे मंदिर” दिसले.

अगदी मस्त बांधकाम, एकदम टिपिकल मंदिर, जसे राम किवा कृष्णाचे असावे, महाराज देव आहेत याची पक्की खात्री पटेल असेच मंदिर, म्हणे राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले आहे, बरेच इतिहास अभ्यासक आणि संशोधक अगदी या गोष्टीचा जोमाने पाठपुरावा करतात, असो त्यांचा आभ्यास आणि त्यांचे विचार असतील.

पण मी हे आजिबात मान्य नाही करणार की, हे जे कधी बांधले आहे आणि ज्याने कोणी बांधले असेल त्याने नक्कीच एक मंदिर म्हणून स्थापना केली नसेल. कारण शिवाजी महाराज म्हणजे एक असे व्याक्तीम्ह्तव होते ज्यांनी एका आंधळ्या समाजाला जागृत करून स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवले आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य निर्माण केले, म्हणजे शिवाजी महराजांना एक आदर्श म्हणून नक्कीच पुढे ठेवला असेल त्यावेळीही, त्यांचे विचार नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल, मग असे असेल तर एक स्फूर्तीस्थान मानून नक्कीच समाधी किवा स्मारक राजाराम महाराजांनी बांधले असेल, पण त्याचे रुपांतर मंदिरात कोणी केले हा प्रश्न जरा विचार करण्यासारखा आहे, याचे उत्तर आज बर्याच जनांना माहित आहे पण का दुर्लक्ष्य करतात माहित नाही.

 मी मात्र एक स्मारक किवा स्फूर्तीस्थान म्हणूनच प्रवेश केला, आतमध्ये गेलो मूर्ती होती, पुढे तलवार ठेवली होती आणि विशेष म्हणजे एक ताट ठेवले होते ज्यामध्ये लोक १-२ रुपयाचे चिल्लर फेकत होते.

“काळजात खंजीर घुपसल्यानंतर ज्या वेदना होतील तश्या त्या वेदना होत्या”

आज तुम्ही एवढे मोठे झाला का हो, कि तुम्ही आता छत्रपतीना १-२ रुपयाची चिल्लर दान करणार (भिक म्हणून टाकायचे असेही या मागचा मनसुबा असेल), आणि माझी फार जुनी इच्छा पण होती कि त्या मंदिरातल्या पुज्यार्याशी जरा वाजावे.

त्यात झाले काय, धाकल्या पाटलांनी मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केला … त्यावर आमचे झालेले संभाषण …

पुजारी : तू बाहेर बोर्ड नाही वाचला का रे ? फोटो काढण्यास मनाई आहे.

धाकले : नाही वाचला … माफ करा … फोटो नाही काढला तसा बी आमी ..

पुजारी : बाहेर एवढे बोर्ड लावूनसुधा लोकाना काळात नाही, आक्कल नाही यांना ?

थोरले : दादा, बोर्ड नाही पहिला … आणि फोटोपण नाही काढला … माफीपण मागितली … कशाला उगाच पुढे जास्तीच बोलताय … बास कि आता …

पुजारी असे बगत होता जसे माझा जीव मारील ….

आंम्ही मुजरा करून बाहेर आलो …

मी आपल सहज पाटलांना म्हणल … काय म्हणल पाटील हे , महाराजांच्या पुढे ताट आणि त्यात लोक चिल्लर टाक्त्यात राव, एवढे वाईट दिवस आलेत का आता महाराजांवर … तेवढ्यात पुजारी मागण मला म्हणला ….

“तू टाकलेस का रे पैसे” … म्हणल शाब्बास भावा … हेच पाहिजे होत मला …

मी म्हणल का टाकायचे ? भिकारी नाही आमचा राजा ज्याला तुमच्या चील्लारांची गरज आहे, तुम्हाला पाहिजे तर सांगा देतो भिक. आणि काहीही बोलायच्या आदी आणि आरेतुरे करण्याआधी पुढे कोण आहे काय आहे याची खबरदारी घ्या वयाने मोठे आहात म्हणून बोलतोय फ़क़्त …..

पुजारी लय चिडला होता, पण काय करणार पुढे काय बोलले कि रट्टे खाणार हे त्याला माहित होते.

पाटलांना म्हणल … “पाटील अशी गारद द्या … कि या मंदिराच्या भिंतीला तडा जाईल” … मग तो पाटलांचा पहाडी आवाज आणि माझ्या धन्याची गारद …. त्या पुजार्याच्या कानठळ्या बसल्या असतील.

त्यादिवासी त्या पुज्यार्याने आम्हाला नाही म्हणल तरी १००० शिव्या दिल्या असतील.

स्फूर्तीस्थानातून बाहेर पडलो, उजवीकडे वळतोय तर मस्त एक घर बांधले होते, गडावरची दगडे वापरून मस्त कमपौंड बांधले होते, पुढे मस्त आंगण होते, खुर्च्या लावल्या होत्या.

म्हणल गडावर एवढे भारी घर कोणाचे, नंतर कळले कि त्या पुज्यार्याचे आहे. म्हणे १६९६ सालापासून त्यांची पिढी या मंदिराची देखभाल करते म्हणून त्याना इथेच राहायची जागा दिली आहे.

आता यावरून तर आपण समजू शकतो नक्की काय भानगड आहे ती …. बघा त्याचे घर ….

 असो… पुढे जावून आम्ही किल्ला पाहण्यात रमलो, पूर्ण तटबंदीवरून किल्ल्याला प्रदक्षणा घालायची ठरवली … तटबंदीवर चढून फिरत होतो … पुढे अफाट समुद्र तटबंदीवर आदळणारे पाणी आणि त्याचा आवाज, मनात एकवेळ आले, जर प्रभू श्रीरामांचा धनुष्य असता तर बाणाची भीती समुद्र देवतेला दाखवून त्याला प्रकट केले असते आणि विचारले असते …

“सांग समुद्रदेवता … कसा होता माझा राजा ?”

भरपूर फोटो काढले, किती फोटो काढू असे झाले होते …

किल्ल्यावर जर तटबंदी सोडली तर काहीच अवशेष शिल्लक नाहीत, ४ विहिरी आहेत, महादेवाचे मंदिर आहे, पूर्ण किल्ला पाहून आम्ही शेवटी अश्या ठिकाणी पोहचलो जिथे जायची इच्छा सिंधुदुर्गवर जाण्याऱ्या प्रत्येकाची असते … ती जागा म्हणजे जिथे महाराजांच्या हाता-पायाचे ठसे आहेत.

किल्ल्याचे बांधकाम सुरु असताना महाराज तिथे आले होते आणि एका बुरुजावर चढताना त्यांच्या हातापायाचे ठसे उमटले गेले आणि ते जतन करून ठेवले.

भाऊ, खर सांगतो ज्यावेळी त्या पायाच्या ठश्याना हात लावला, एक वेगळेच सुख प्राप्त झाले हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आणि त्याना आपण हाथ लावू शकतो, काय असते दुसरे सुख सांगा.

 नशीब, त्या महात्म्याच्या चरणांचा स्पर्श मिळाला, समाधानाची बाब आहे ही. चार्नानाचे दर्शन घेवून आम्ही बुरुजावरून खाली उतरलो, त्या बलाढ्य महादार्वाज्याला मुजरा करीत बाहेर पडलो.

आम्ही ज्या बोटीतून आलो होतो ती तर नव्हतीच तिथे, बाकीचे काही आम्हाला घेवून जानाच्या मनस्थित नव्हते, शेवटी महाराजांना आपल्या लाडक्या लेकरांची काळजी आहेच की,

एक नागपूरचा असणारा पण तिथे काम करणारा माणूस भेटला, बोलण्या बोलण्यात आमचे प्रेम झाले आणि त्याने एका बोटीवाल्याला सांगितले …

“घेवून जारे आपली माणस आहेत ही”

मग काय टनकरून बोटीत बसलो आणि किनार्याला पोहचलो.

पुढे मग आम्ही पद्मगड पहिला, काहीही नाही गडावर तसा परिपूर्ण गड म्हणता येणार नाही, सिंधुदुर्गला रसद पोहचवण्याच्या उद्देशाने बांधलेला टापू असावा.

पुढे मग जेवण केले, जाम भूक लागली होती, मस्त मासे खाल्ले, शिवबा आमचा जेवण करून तिथेच तासभर झोपी गेला, त्याची झोप होईपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो, आमच्याकडे वेळ होता, मग जवळच असलेले दोन छोटे किल्ले “सर्जाकोट” आणि “राजकोट” पहायचे ठरवले आणि ते दोन पाहून परत तांदुळवाडी जिथे आम्ही सकाळी फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो तिथे मुक्कामाला जायचे ठरवले.

शिवबा उठल्यावर मग आम्ही किल्ले राजकोटकडे निघालो ….

क्रमश:

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “कोकनाची वारी : भाग – 2Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *