IMG_9013-01

अनिल दुधाने …ध्येयवेडा !!

भटकंती …

सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून पाऊल वाट शोधत गडकोट फिरणे यामध्ये प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आहे, यास आपण भटकंती असे म्हणू लागलो, म्हणजेच एका जनतेच्या राजाच्या मुलुखात एका गडवेड्या माणसाने केलेली एक यात्रा असेही आपण म्हणू शकतो.

पण वेड नेमक कश्याच असाव ?
आख्खा सह्याद्री पायाखालून घालवून साध्य काय झाल ?

भटकंती करत असताना, सह्याद्रीच सौंदर्य पाहून फोटो काढणे आणि फेसबुक वर “माझा सह्याद्री”, “माझा राजा” अश्या असंख्य विशेषनासोबत अपलोड करणे, गड-किल्ले पाहून त्यांची झालेली दुर्दश्या यावर सरकार आणि मराठी माणसाला शिव्या देणे आणि या गडकिल्ल्यांच्या नशिबाला दोष देणे यापलीकड आपल्या हातात काही राहत नाही, याच बरोबर थोडसे भावनिक होऊन १७ व्या शतकात महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी अनुभवलेल्या क्षणामध्ये आपण गुरफटत जातो, आणि यामुळे सह्याद्री आणि शिवाजी महाराज हे आपले भावनिक विषय होऊन बसले.

भावनिक गुंतागुंतीतून बाजूला होऊन वस्तिविक्तेचा विचार मांडावा तर तो मनुष्य हरामखोर किवा शिवाजी महाराज विरोधी होतो. त्यामुळे भूतकाळात झालेल्या चुका दुरुस्त करून एका उज्वल भविष्याचे स्वप्न या सह्याद्रीसाठी पाहणे हे देखील जिकीरीचे झाले आहे.

मी मात्र “गडवेड्या” हा शब्द “ध्येयवेड्या” या शब्दाने बदलून टाकीन, या सह्याद्रीत फिरताना गडकिल्ले सोडा, पण या सह्याद्रीच्या काना-कोपर्यात असंख्य लहान गाव आहेत जिथे आजही खूप काही लपले आहे. असंख्य गुहा ज्या काळाच्या ओघाने मुजून गेल्या, असंख्य गुहा/लेण्या आहेत जिथे आजवर कोणी पोहचल नाही,असंख्य समाध्या आज रस्त्याच्या बाजूचा दगड होऊन बसल्या आहेत, असंख्य वीरघळी ज्या आजही मातीच्या ढिगार्यात अडकून पडल्या आहेत,

मित्रांनो या वीरघळी, गुहा, लेण्या नाहीत तर आपला आभाळापेक्ष्या मोठा इतिहास आज मातीच्या ढिगार्यात अडकून पडला आहे. जगाच्या इतिहासावर अधिराज्य गाजवलेल्या आपल्या मावळ्यांच्या समाध्या रस्त्यावरचा दगड होऊन बसल्या आहेत. जर ह्या इतिहासाचे जतन करून दडून बसलेला इतिहास जर बाहेर काढायचा ध्यास जर हरएक भटक्याने घेतला तर ?

असाच एक भटका म्हणजे “अनिल दुधाने”.

मध्यम वर्गीय मनुष्य, पोटापाण्यासाठी आपल गाव सोडून पुण्यात येवून स्थायिक झालेला पण गावाकडची नाळ न तुटलेला एक तरुण. माझी फ़क़्त एकदाच भेट झाली तीही त्यांच्याच बरोबर त्यांच्या गावी जात असताना.

खिंगरगाव, पाचगणी पासून अंदाजे ८-१० किलोमीटर अंतर, सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अलगत बसलेले हे गाव. गावाकड बर्यापैकी चांगली शेती, प्रशस्थ घर, स्वता अभ्यास करून नवीन-नवीन प्रयोग करून एक प्रगतशील शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यातून मिळवलेले चांगले यश, याचबरोबर गडकिल्ले फिरणे, इतिहासाच्या पुस्तकाची पाने चाळणे अश्या गोष्टींची आवड असणारे, याच बरोबर आपल्या “गावाचा विकास” यावर सतत विचार करणारे आणि प्रामाणिक प्रयत्न करणारे असे हे अनिल भाऊ.

यांच्या गावच्याच जवळ एक शिखर आहे ज्याला “राजपुर शिखर” किवा “राजपुरी केव्स” असेही म्हणतात.
शिखराच्या डाव्याबाजूलाच वैराटगड आहे. याच गावात प्राचीन काळच्या गुहा. या गुहा एका इग्रज अधिकार्याने १८८५ साली प्रथमता शोधून काढल्या, नंतर १९४३ साली संत गाडगेबाबा याठिकाणी आले आणि गुहा पाहण्यासाठी खाली उतरण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्यांनी त्या गावकर्यांच्या मदतीने बांधून घेतल्या.या गुहा अंदाजे ५००० वर्ष्ये जुन्या असून याला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे, तर या भागात अनिल भौनी जे कार्य केले त्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे, जी तुम्ही खालील video मध्ये पाहू शकता (आवाज जर कमी असल्यास head -phone लावून हा video पहावा.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “अनिल दुधाने …ध्येयवेडा !!Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *