human resource management

माणसांची शेती म्हणजे नेमक काय ?

माणसांची शेती म्हणजे नेमक काय ? 

असा प्रश्न बऱ्याचदा पडतो मग आपण काहीतरी वाक्ये बोलतो (स्वताच्या समजूतीवरून).

पण मी जरा माझ्या पध्दतीने या विषयाकडे पहिले, अर्थातच माझ्या राजाचा इतिहास बरोबर घेऊन. म्हणून म्हणल तुमच्याबरोबर जरा बोलून घ्याव काय चुकत असेल तर नक्की सांगा.

माणसांची शेती म्हणजे , माणसे जोडणे म्हणजे “माणसाना प्रभावित करणे” पण दुरदैवाने आजकाल लोकांनी त्याची व्याख्या बदलून “माणसावर प्रभुत्व गाजवणे” असे केली आहे.आहो माणसे जोडणे म्हणजे मनमोकळे असणे , मतमोकळे असणे.दुसऱ्याच्या मनाचे मनाशी नाते जोडणे.आपल्या माणसांना आपल्यासोबत घेऊन त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे पण याचवेळी प्रत्येक माणूस वेगळा असतो, याचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि हेच वेगळेपण जपता जपता ते वेगळेपण जाऊन जुळलेपण कसे येईल याचा विचार करणे आवश्यक.


माणसांची शेती करताना आपण एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे, ती म्हणजे माणसे जोडणे म्हणजे स्वत:ला हरवणे नव्हे, तर नात्यांच्या माध्यमातून स्वत:चाच शोध घेणे. माणसे जोडणे म्हणजे कुणीच परिपूर्ण नसते हे सत्य स्वीकारणे. आपण इतरांच्या चुकांकडे पाहतो तसेच स्वत:च्या चुकांकडे पाहणे.

माणसे जोडणे म्हणजे स्वत:ला मोठे करण्यासाठी कुणाला कमी लेखणे असे नाही तर सर्वांना एकत्रित रित्या जाणून घेऊन पुढे जाने असे होय. आपल्या व्यक्तित्वातील काटे इतराना बोचणार नाहीत, याची दक्षता घेणे. सहज, स्वाभाविक, वागणे, पण…..स्वभाव बदलताही येतो, याची जाण ठेवणे.

आपले मत,अटी, नियम दुसऱ्यावर न लादता समोरचा जसा आहे तसेच त्याला स्वीकारून कोणताही वाद न करता एकत्रित रित्या एक निरामय जीवन जगणे म्हणजे माणसांची शेती करणे होय.

एखाद्या माणसावर एखाद्या प्रकारचा शिक्का मारणे हे चुकीचे आहे उलट समोरचा माणूस किती आणि कसा महत्वाचा आहे हे आपण स्वत जाणून घेतले पाहिजे आणि त्याला जान करून देणे तेवढेच आवश्यक आहे. प्रत्येकाला  प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणे आपण शिकले पाहिजे.रागाला आवर घालून त्याचे रूपांतर लाभात कसे करता येईल हे आपण शिकले पाहिजे, यासाठी स्वताचे मन साफ आसने फार महत्वाचे आहे मित्रांनो.

हे सगळ करताना मतभेद होतील, विचार विनिमयही करावा लागेल पण हे करताना मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे हे लक्ष्यात ठेवा. माणसे जरी बदली तर आपण आपला इतिहास बदलून तर नाही चालणार तसे झाले तर मग आपल्या सोबत जळत्या निखार्यासारखे कोण राहणार ?

माणसे जोडणे म्हणजे अपमानाचा बदला मानाने घेणे, टीकाकारांचे तोंड आपल्या कृतीतून बंद करणे, जर कुणावर प्रेम नाही करू शकत तर तिरस्कारही न करणे.इतरांच शक्य तितके भले करणे.भले करता आले नाही, तरीनुकसान न करणे.


 

आपण जीते काम करतो त्या कामाला महत्व देणे कामाशी प्रामाणिक रहाणे, आवश्यक तिथे ठाम राहणे. आपला मालक आपला स्वामी आहे त्याच्याशी प्रामाणिक आणि निष्टेने राहिले पाहिजे.आपल्या सहकार्यांना प्रेरित केले पाहिजे , जर कोणी कमी पडत आसेल तर त्याला पुढे ओढले पाहिजे.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “माणसांची शेती म्हणजे नेमक काय ?Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *