मुलभूत माहिती:
१) प्रकार – खडतर
२) ट्रेकचे अंतर : ८ ते १० किलोमीटर
३) पुण्यापासून ३२० किलोमीटर (पुणे-नासिक-धीन्दोरी-वणी- कळवण-डांगसौदाणे-साल्हेर)
४) Difficult Level : Medium
५) ट्रेकिंगचा दिवस : ४,५ जाने २०१४
मागील वर्ष म्हणजे २०१३ मध्ये बर्यापैकी सह्याद्री चाळून काढला होता बरेच किल्ले सर केले, पन्हाळा-विशालगड वारी केली, जावळीचे खोरे महाबळेश्वर पासून ते प्रतापगडापर्यंत तुडवले . पण सारखी एकच चर्चा व्हयाची ती म्हणजे सातपुडा पर्वत रांग कधी पायाखालून घालवायच्या ? आळस म्हणजे प्रवास जास्तीचा होतो कारण नाशिकच्या भागातच बर्यापैकी किल्ले आणि पर्वत आहेत. पण २०१४ मध्ये पूर्ण धून काढायचे ठरवले आणि सुरवात करायची ती ऐतहासिक महत्व असलेले आणि आमच्या मावळ्यांनी पहिली समोर-समोर लढाई करून (म्हणजे गनिमी काव्या शिवाय ) जिंकलेला भारी भक्कम किल्ला “किल्ले साल्हेर”.
राकेश भाऊ नि मोहीम आखली आणि शनिवारी सकाळी पहाटेची पहिली प्रहर उजाडली कि प्रवास सुरु करायचा असा बेत ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रवास सुरु झाला. बिचारा नितीन आदल्या दिवसी रात्रीच कोल्हापुरातून आला होता, पण सकाळी एकदम फ्रेश होता.
पहिला stop नारायणगावात घेण्याचे ठरवले कारण तिथे बस stand च्या समोर मस्त मसाला दुध मिळते :). तिथून मग आम्ही न थांबता प्रवास चालू ठेवला आणि नासिक मध्ये पोहचलो. आम्ही इथेपर्यन्तचा प्रवास ४ एक तासात केला होता. मग आम्ही कळवणच्या दिशेने प्रवास सुरु केला. जाताना टोल नाक्याजवळ डाव्या बाजूला “रामशेज” किल्ला दिसत होता … भला मोठ्ठा इतिहास आहे या किल्ल्या पाठीमागे, मराठ्यांनी हा किल्ला ६ वर्षे झुंजवला होता. आम्ही ठरवले जर उद्या लवकर परत आलो तर नक्की या किल्यावर जायचे. (जे झाले नाही).
नितीन भाऊ त्याच्या मोबाईल मध्ये map वर साल्हेर चा रस्ता पाहत होते आणि आजू बाजूचे लोक वेगळेच काहीतर सांगत होते मग आम्ही विषयाची परीक्ष्या न घेता गावकरी सांगतात त्या रस्त्याने जायचे ठरवले आणि आम्ही वनी मार्गे कळवण ला पोहचलो इथून थोडी गम्मत झाली, एकजण म्हणाला सरळ सटान्याला जावा आणि तिथून साल्हेर ला …. अंदाजे ५० किलोमीटर आणि दुसरा एकजण म्हणाला थोड्या अंतरावर एक छोटे गाव आहे “डांगसौदाणे” तिथून डावीकडे जावा २०-२२ किलोमीटर साल्हेर. काही केल्या लोक “सटान्याला जावा” हा पाडा काय सोडत नव्हते. शेवटी आम्हाला साल्हेर चा बोर्ड दिसला आणि मग जरा आम्ही relax झालो. कारण प्रवासाचा जाम कंटाळा आला होता.
थोड्या अंतरावर जाऊन आम्ही एका झाडाखाली बसून मस्त जेवण केले चिकन,अंडी गुळाच्या पोळ्या मस्त एकदम पौष्टिक आहार.
जाताना वाटेत पाणी चालू होते पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या, जसे पुढे जाईल तसे बरेच डोंगर दिसत होते पण नक्की साल्हेर कोणता हे जाणून घ्याची इच्छा फार होती म्हणून एका आजोबाना आम्ही विचारले ….
आजोबा म्हणाले …त्यो बघा … त्यो … दिसतुई का ??? त्योच बघा सालेरचा किल्ला … फकस्त २ किलोमीटर हाय बघा …. !!
किल्ला पहिला जबरदस्त अझ्सा उंच आणि मोठ्ठा…. उत्सुकता लागली होती, मनामध्ये सारखा एकच प्रश्न येत होता तो म्हणजे “कसी लढाई झाली असेल ?” … गडाचा लांबून फोटो काढूयात असे वाटले आणि गाडी थांबून थोडे फोटो काढले….
किल्ल्याच्या पायथ्याला पोहचलो रस्त्याच्या उजव्या बाजूलाच १-२ दुकाने होती बाजूला गाडी लावायला जागा होती , तिथे गाडी लावली , १-२ वस्तू दुकानातून घेऊन आम्ही ट्रेक सुरु केला, शक्यतो मुक्कामाला कमी जाणारे ट्रेकर्स आम्ही यावेळी मुक्कामाला आलो होतो त्यामुळे ब्यागेत समान जरा बर्यापैकी होते त्यामुळे वजन खूप होते आणि त्याची जाणीव आम्हाला अगदी सुरवातीलाच झाली आणि चांगलीच दमछाक होत होती. तरीपण काही पर्याय नव्हता चढाई सुरु ठेवली वाटेत फोटो कडत कडत आम्ही ट्रेक सुरु केला.
थोड्या अंतरावर गेल्यावर जरा एकमेकाच्या ब्यागा चेक करून काही सामान इकडे तिकडे करता येते का पहिले आणि मग थोडी सामानाची आदलाबदली करून एकमेकाचा बोजा share केला.
राकेश भाऊ नि त्यांची जीन्स प्यांट तितेच एका झाडाच्या फांद्यांमध्ये ठेवायची ठरवली म्हणजे थोडे वजन कमी होईल. 
चांगले उन पडले होते , पाटीवर मस्त वजन होते किल्ला पण मस्त खडा होता सरळ वाट कुठेच नाही , फ़क़्त चढणेच होते … खूप घाम येत होता … दम लागत होता
पण थोडे थांबून .. पाणी पिउन चढाई सुरु ठेवली….
राकेश भाऊ मला दाखवत होते कि कुणाची ब्याग जास्त ओझी आहे ती… आणि वरून तू जिम करणारा माणूस तुला काय असा हि टोमणा मारायचे …..
महाराष्ट्रातील दोन नंबरचे उच्च ठिकाण … अतिशय मोठ्ठा किल्ला … भयंकर थंडी … आणि अश्या या किल्ल्यावर रात्रीच्या वेळी गुहेत मुक्कामाला आम्ही फ़क़्त तिघे. दुसरा कोणताही ट्रेकर नव्हता ना कोणी गावकरी, पण एक हि आमची लाडकी मैत्रीण जीने अगदी शेवट पर्यंत आम्हला साथ दिली … आम्ही गुहेत झोपलो तर तिने आमची राखनच केली.
आता मात्र आमचा वेग ठीक होता आणि आम्ही ठरवले कि आता मेन दरवाजा गाठे पर्यंत बसायचे नाही …. आणि आम्ही गड चढत राहिलो … मी नेहमी पाठीमागे असायचो कारण फोटो काढण्याच्या नादात मी नेहमीच मागे राहतो
… मस्त फोटो काढत किल्ला चढत होतो.
मग आम्ही पहिल्या दरवाज्य पर्यंत पोहचलो जिथे एक आजोबा भेटले त्यांनी त्यांच्या वेगळ्याच मराठीत आम्हाला गडाबद्दल माहिती दिली म्हणजे राहण्याची सोय , पाणी वगैरे … बहुतेक त्यांची ती ऐरणी भाषा … ज्याला ते मराठी म्हणतात काही शब्द कळतात काही काळात नाहीत पण त्यांना काय म्हणायचे आहे ते नक्की कळते
.. थोडे फार फोटो काढले … गप्पा गोष्टी झाल्या …..
इथून मग पुढचे वेध लागले ते महा दरवाज्याचे …. बरेच अंतर होते अजून .. बर्याच पायऱ्या चढायाच्या होत्या … अगदी दमछाक करणाऱ्या पायऱ्या होत्या पण कमी होत्या त्यामुळे काही फारसा त्रास नव्हता
…. तेवढे पार करून आम्ही मग महादरवाज्यातून आतमध्ये गेलो आणि एक निश्वास टाकला … संध्याकाळची वेळ ….गार गार वारा होता…किल्याच्या तटबंदीवर बसलो होतो … काय तो अनुभव होता….. अगदी ला जवाब.
संध्याकाळची वेळ होती….
गार गार वारा होता…
किल्याच्या तटबंदीवर बसलो होतो….
आणि सखेशी बोलत होतो .
तिथून पुढे मग आम्ही आमच्या राहण्याची जागा म्हणजे “गुहा” शोधू लागलो … पूर्ण गडावर आम्ही तीन जणच होतो त्यामुळे कुणाला विचारायचा प्रश्नच नव्हता … वाटेत एक मोठ्ठा तलाव लागला .. ऐकून माहित होते कि तलावाच्या बाजूलाच गुहा आहे पण कुठे दिसत नव्हती …. शेवटी मी आमचे मित्र पंकज झरेकर न फोन लावला आणि विचारले … त्यांच्या सांगण्यावरून आम्ही थोडे पुढे गेलो जिथे दुसरा एक मोठ्ठा तलाव होता … त्याच्या बांधकामाची काय ती झलक होती …. अगदी रेखीव असे तलावाचे बांधकाम …. त्या तलावाच्या वरच्या बाजूला गुहा होती …. राकेश ने एक चक्कर मारली आणि त्याला गुहा सापडली … मग आम्ही सगळे गुहेच्या दिशेने गेलो…..
संध्याकाळच्या वेळी … बालेकिल्ल्या वरून परशुरामाचे मंदिर एकदमच सुंदर दिसत होते…. आकाश निळे होते … थोडेशे ढग आकाशात तरंगत होते .. आणि त्यावर मावळत्या सूर्याची लाल-लाल किरणे त्यावर पडत होती… एकदम रम्य अशी ती सायंकाळ होती.
गुहेत रात्रभर झोपणे म्हणजे एक खूपच वेगळा अनुभव …. तुमच्या शेजारी पाजारी उंदीर मामा फिरत होते … प्लास्टिकच्या पिशव्या कुरतडत होते … आमच्या काही प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही वरती दिवळीत ठेवल्या होत्या जेणेकरून उंदीर मामा तिथे पर्यंत पोहचणार नाहीत … पण तसे काही झाले नाही …. त्यांनी आमच्या पिशवीतील भरपूर शेंगदाणे खाल्ली होती … रात्री अचानक मला जाग यायची कारण एकदम डोक्याच्या वरती त्यांचा आवाज यायचा … वाटायचे हे आता आमच्या ब्यागा पण खातात का काय …. पण तसे काही झाले नाही …. गुहेत आजीबात थंडी वाजत नव्हती … एकदम मस्त झोप झाली …. सकाळी आम्ही ६ वाजता उठलो …. सकाळचा कार्यक्रम आवरून आम्ही वरती कड्यावर जायचे आणि परशुरामाचे दर्शन घ्याचे ठरवले आणि आम्ही पुढे निघालो….
जसे आम्ही कड्यावर पोहचलो … असे वाटले ढगांच्या वरती बसून जमीन पाहतोय .. नक्कीच कोकण कड्यासारखी नव्हती पण एकदम जबरदस्त होती …. कोणी विचार हि करू शकणार नाही तिकडून चढायची … म्हणूनच वाटले कि का इकडे तटबंदी नाही …. एकदम मस्त वर होता सकाळची कोवळी सूर्याची किरणे …. व्हा …. अतिशय सुंदर आणि सुखद अनुभव…. मस्त पैकी आम्ही फोटो काढले … थोडा खान-पिन झाले…..

तो सुखद अनुभव घेऊन आम्ही पुढे परशुरामाच्या मंदिराकडे निघालो …. अगदी थोडासा चढ होता …. मस्त पायवाट …. काहीही कसरत न करता आम्ही मंदिरापर्यंत पोहचलो … खर सांगतो…. अतिशय जबरदस्त जागा आहे हि …. महाराष्ट्रातील दोन नंबरचे उच्च ठिकाण … अतिशय मोठ्ठा किल्ला …. खूप थंड वारे वाहत होते… फोटो कड्याचा मोह आवरला नाही म्हणून पोट भरून फोटो काढले …..
गडावर फिरताना राकेश भाऊ सारखे सारखे इकडे तिकडे बोट करून म्हणायचे …. पश्य हे बघ मुंगी-तुंगी …. मी पण बघ्याचो आणि थोड्या वेळाने दुसरी मुंगी-तुंगी दिसायची…. शेवटी मग आम्ही एकच फायनल केली … 
साल्हेर किल्ल्यावरील परशुरामाचे मंदिर !!!
इतिहास : गडाच्या माथ्यावर मंदिर आहे. हे मंदिर रेणूका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. या माथ्यावरुनच बाण मारुण परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते.
शेवटी मग आम्ही परतीचा मार्ग धरला …. मनसुबा होता तो २ तासात गाडी पर्यंत पोचायचे … आणि विशेष म्हणजे आम्ही पोहचलो सुद्धा
येताना आम्ही काही जास्त थांबे घेतले नाहीत … जमेल तिथे थोडे फार फोटो काढत होतो आणि चालन चालू होते ….
पूर्ण ट्रेक मध्ये आमच्या तिघांचा एकही फोटो नव्हता कारण कोणी भेटलेच नाही जो फोटो काढेल …. म्हणून शेती आम्ही नितीन च्या मोबायीलच्या front कॅमेरा ने आमचा एक फोटो काढला …..

खाली गावात येउन आम्ही हात-पाय धून मस्त फ्रेश झालो …. कपडे बदलले …. पाणी पिले … मस्त चहा मारला …. आणि मग नाशिक कडे प्रवास सुरु केला … कारण तितेच आम्ही जेवणाचा बेत होता …. आमचे नितीन भाऊ दोन वर्षे नासिक मध्ये होते त्यामुळे कुठे चांगले मस्त मटन-भाकरी मिळेल ते त्यांना माहित होते
… नासिक मध्ये पोहचल्यावर आम्ही जवळ जवळ ४० मिनिटे आत शहरात फिरत होतो पण हॉटेल येत नव्हते … राकेश भाऊ वैतागले होते कारण जाम भूक लागली होती…. शेवटी ते हॉटेल आले त्याचे नावच एकदम मस्त होते ते म्हणजे “दिवट्या-बुद्ल्या”….. जेवण करून मग मात्र पुण्याचा रस्ता फारच कंटाळवाणा वाटत होता … कारण मस्त जेवण झाले होते आणि त्यात तो नासिक-पुणे रस्ता …. शेवटी ताबडतोड गाडी मारत ८ वाजता आम्ही पुण्यात पोहचलो….. घरी मग राकेश आणि नितीन ने मस्त परत एकदा मांसाहारी जेवण केले … बायकोने मस्त रस्सा केला होता …. मग राकेश आणि नितीन राकेशच्या घरी निघाले जिथून नितीन कोल्हापूरला जाणार होता …..
असा हा आमचा एकदम मस्त आणि वेगळा प्रवास … सुखमय आणि आनंदमय झाला.
गाडीतून जाताना मला राजदूत गाडी दिसत होती पण फोटो काढता आला नाही… पण शेवटी रस्त्यावर आम्हाला एक गाडी भेटली आणि मग मी फोटो घेतला 











































































0 comments on “किल्ले साल्हेर” Add yours →